दाेन महिन्यानंतर ‘एसटी’चा संचार सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:11 AM2021-06-09T04:11:19+5:302021-06-09T04:11:19+5:30

ब्रिजेश तिवारी लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी : राज्य शासनाने काेराेना संक्रमण राेखण्यासाठी लागू केलेले लाॅकडाऊन शिथिल केल्याने एसटी महामंडळाने ...

After two months, ST started broadcasting | दाेन महिन्यानंतर ‘एसटी’चा संचार सुरू

दाेन महिन्यानंतर ‘एसटी’चा संचार सुरू

Next

ब्रिजेश तिवारी

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी : राज्य शासनाने काेराेना संक्रमण राेखण्यासाठी लागू केलेले लाॅकडाऊन शिथिल केल्याने एसटी महामंडळाने त्यांच्या बसेस पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यात काटाेल आगाराच्या २०० बसेसचा समावेश असून, या बसेसचा संचार सुरू झाला आहे. या निर्णयामुळे ग्रामीण व शहरी भागातील सामान्य प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

काेराेना संक्रमण राेखण्यासाठी लागू केलेल्या उपाययाेजनांमुळे एसटीची प्रवासी वाहतूकही बंद करण्यात आली हाेती. काेराेना संक्रमणाच्या पहिल्या टप्प्यात एसटी बसेस पाच महिने बंद ठेवण्यात आल्याने एसटी महामंडळाला ताेटा सहन करावा लागला. त्यातच काही प्रमाणात बसेस सुरू झाल्या आणि पुन्हा लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यामुळे महामंडळाने या काळात प्रवासी वाहतूक न करण्याचा निर्णय घेत शासनाला सहकार्य केले. त्यामुळे त्यांच्या ताेट्यात आणखी भर पडली.

बसेसची वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने या काळात नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील काेंढाळी (ता. काटाेल) व इतर बसस्थानक ओस पडले हाेते. ही वाहतूक पूर्ववत झाल्याने काेंढाळीसह अन्य बसस्थानक व बसथांब्यांवर प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. बसेस सुरू करण्यात आल्याने साेय झाल्याच्या प्रतिक्रियाही प्रवाशांनी व्यक्त केल्या.

...

काटाेल-नागपूर मार्गावर २५ फेऱ्या

काटाेल-नागपूर मार्गावर दर तासाला एक याप्रमाणे राेज २५ बसफेऱ्या तर काटाेल-काेंढाळी मार्गावर दर ४५ मिनिटाला एक, काटाेल-सावरगाव-नरखेड मार्गावर चार याप्रमाणे बसफेऱ्या सुरू करण्यात आल्याची माहिती काटाेल आगाराचे व्यवस्थापक कुलदीप रंगारी यांनी दिली. साेबतच काटाेल बसस्थानकाहून वर्धा, वरुड, सावनेर या मार्गावर बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. वरुड व मोवाड येथे मुक्कामी बसफेरी सुरू केली आहे. प्रवाशांची संख्या व मागणीनुसार बसफेऱ्या वाढविण्यात येणार असल्याचे कुलदीप रंगारी यांनी स्पष्ट केले.

....

स्वत:च स्वत:ची काळजी घ्या

काेराेना संक्रमण कमी झाले असले तरी ते पूर्णपणे नाहीसे झाले नाही. प्रवासी बसमध्ये गर्दी करीत असून, काेराेना प्रतिबंधक उपाययाेजनांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करतात. काही प्रवासी बसचालक व वाहकांनाही जुमानत नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी बसमध्ये प्रवास करताना स्वत:च स्वत:ची काळजी घेत मास्कचा नियमित वापर करणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे व सॅनिटायझेशनवर भर देणे या बाबींवर अंमल करणे गरजेचे आहे.

Web Title: After two months, ST started broadcasting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.