अनलॉकनंतर बस रेल्वेही हाऊसफुल्ल()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:06 AM2021-06-10T04:06:50+5:302021-06-10T04:06:50+5:30

दररोज प्रवासी ९८८० रेल्वे फेऱ्या - ८५ प्रवासी - १०,५०० लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनलॉकनंतर जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक ...

After unlock, bus and train are also housefull () | अनलॉकनंतर बस रेल्वेही हाऊसफुल्ल()

अनलॉकनंतर बस रेल्वेही हाऊसफुल्ल()

Next

दररोज प्रवासी ९८८०

रेल्वे फेऱ्या - ८५

प्रवासी - १०,५००

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अनलॉकनंतर जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू झाली आहे. वाहतूक सेवा सुरू होताच प्रवाशांचाही त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. रेल्वे आणि बस हाऊसफुल्ल चाालत आहेत.

नागपूर जिल्ह्यात एकूण एसटीच्या ४५० फेऱ्या सुरू आहे. यातून दररोज ९८८० प्रवासी प्रवास करीत आहेत, तर रेल्वेतर्फे ८५ फेऱ्या सुरू असून, दररोज १०,५०० प्रवासी प्रवासी करीत आहेत. एकूणच अनलॉकनंतर सार्वजनिक वाहतूक सेवेला प्रवाशांकडून मिळत असलेला प्रतिसाद पाहता बस व रेल्वे सेवा लवकरच सुरळीत हाेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एसटी सुरू झाल्याने मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील दुकानदार व व्यापारीही उत्साहात आहेत.

बॉक्स

रेल्वेने बिहार राजस्थान, कोलकाता, तर बसने अमरावती, यवतमाळकडे जाणारे प्रवासी अधिक

सध्या रेल्वेने प्रवास करणाऱ्यांमध्ये बिहार, राजस्थान, मुंबई आणि कोलकाता येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, तर बसने प्रवास करणाऱ्यांमध्ये अमरावती, यवतमााळ, भंडारा व गडचिरोलीला अधिक पसंती असल्याचे दिसून येते.

बॉक्स

अत्यावश्यक कामासाठीच प्रवास

प्रवाशांची गर्दी वाढली असून, अत्यावश्यक सेवेसाठीच नागरिक प्रवास करीत असल्याचे दिसून आले. मध्यवर्ती बसस्थानक व रेल्वे स्थानकातील काही प्रवाशांना याबाबत विचारणा केली असता ही बाब दिसून आली.

कोट

माझा मोठा भाऊ भंडाऱ्याला राहतो. त्याची मुलगी म्हणजे माझ्या पुतणीचे लग्न ठरले आहे. ११ तारखेला लग्न आहे. त्यासाठी जाणे आवश्यक आहे. आता सर्व वाहतूक सुरू झाल्याने सहजपणे जाणे शक्य झाले आहे.

संतोष निमसरकार

आम्ही मुंबईला राहतो. नागपूरला नातेवाईक राहतात. काही दिवसांपूर्वी एका नातेवाइकाचा मृत्यू झाला होता. त्यासाठी आलो होतो. आता परत जात आहोत.

अंजली देशपांडे

बॉक्स

बसेसच्या फेऱ्या वाढविल्या

‘शासनाने अनलॉक केल्यानंतर एसटीची प्रवासी संख्या वाढली. त्यामुळे आम्ही एसटी बसेसच्या फेऱ्यांत वाढ केली आहे.’

-नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर

बॉक्स

प्रवाशांची संख्या वाढत आहे

‘महाराष्ट्रात अनलॉक झाल्यापासून प्रवाशांची संख्या वाढत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आम्ही काळजी घेत आहोत. प्रवाशांनीही आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी.‘

-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी

Web Title: After unlock, bus and train are also housefull ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.