अजय राऊतवर पुन्हा वार

By admin | Published: July 21, 2016 01:57 AM2016-07-21T01:57:10+5:302016-07-21T01:57:10+5:30

पोलिसात तक्रार दाखल केल्याने दुखावलेले गुन्हेगार आता पीडितांवर हल्ले करू लागले आहेत. मागील २४ तासात या प्रकारच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत.

Again on Ajay Raut | अजय राऊतवर पुन्हा वार

अजय राऊतवर पुन्हा वार

Next

गुन्हे पीडितांवर हल्ले : पोलीस तक्रार केल्याने बार मॅनेजर जखमी
नागपूर : पोलिसात तक्रार दाखल केल्याने दुखावलेले गुन्हेगार आता पीडितांवर हल्ले करू लागले आहेत. मागील २४ तासात या प्रकारच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. पहिली घटना सीताबर्डी पोलीस ठाणे परिसरात घडली. यात बिल्डर आणि क्रिकेट बुकी अजय राऊत हा पीडित आहे.
अजयचे सहा महिन्यांपूर्वी खंडणीसाठी प्रतापनगर परिसरातून अपहरण करण्यात आले होते. पावणेदोन कोटी रुपयांची खंडणी घेतल्यानंतर त्याला सोडण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हेगार राजू भद्रे, दिवाकर कोत्तुलवार, सुनील भाटियासह सहा आरोपींना अटक केली होती. तीन आरोपींचा अजूनही शोध सुरू आहे. मोकांतर्गत गुन्हा दाखल केल्याने अटक करण्यात आलेले आरोपी तुरुंगात आहेत.
अजय राऊत मंगळवारी रात्री १ वाजता अ‍ॅक्टिव्हाने घरी जात होते. सीताबर्डी पोलीस ठाणे परिसरातील महाराजबाग चौकात पल्सरवर स्वार दोन तरुणांनी अ‍ॅक्टिीव्हा गाडीला लाथ मारून अजयला खाली पाडले होते. अजयला काही समजण्यापूर्वीच दोन्ही आरोपी त्याला ‘जास्त हुशारी करीत आहे, कोर्टबाजी करीत आहे’ असे म्हणत पळून गेले.
अजयने सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे मोका प्रकरणही पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी अजयच्या भावाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगाही आरोपी होता. मोका प्रकरणात पोलीस फरार आरोपींना अजूनही शोधू शकले नाही. शहर पोलिसांनी मोकांतर्गत रेकॉर्ड कारवाई केली, तरीसुद्धा या प्रकारच्या घटनांमुळे पीडितांमध्ये दहशत पसरली आहे.
दुसऱ्या घटनेत गुन्हेगारांनी त्यांच्याविरुद्ध पोलीस तक्रार करणाऱ्या बार मॅनेजरवर हल्ला केला.

पोलीस घेणार
का दखल ?
नागपूर : हुडकेश्वर येथील गुन्हेगार पप्पू शाहू याने दोन महिन्यांपूर्वी भिलगाव येथील त्रिमूर्ती बार मॅनेजर विनोद तुरक यांना धमकावले होते. विनोदच्या तक्रारीनुसार हुडकेश्वर पोलिसांनी पप्पूविरुद्ध धमकावण्याचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पप्पूला पोलिसांनी अटक केली नव्हती. मंगळवारी रात्री १० वाजता पप्पू आपल्या पाच साथीदारांसह बारमध्ये पोहोचला आणि वाद घालू लागला. वेटर व कर्मचाऱ्यांना धमकावत बारमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करायला सांगितले. पप्पूच्या एका साथीदाराने विनोदच्या पायाला चावा घेतला. विनोदच्या डोक्यावर शीतपेयाची बॉटल मारून जखमी केले. पोलिसांनी पप्पूविरुद्ध हल्ला करणे व धमकावण्याचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Again on Ajay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.