पुन्हा पारा घसरला!
By admin | Published: January 4, 2016 05:06 AM2016-01-04T05:06:09+5:302016-01-04T05:06:09+5:30
नवीन वर्षाच्या स्वागतासोबतच उपराजधानीतील पारा पुन्हा खाली घसरू न थंडी जोर पकडू लागली आहे. रविवारी
नागपूर : नवीन वर्षाच्या स्वागतासोबतच उपराजधानीतील पारा पुन्हा खाली घसरू न थंडी जोर पकडू लागली आहे. रविवारी शहरातील तापमान अचानक खाली उतरू न किमान ११.२ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. हवामान खात्यानुसार शनिवारपासून वाऱ्यांनी गती पकडली आहे. त्यामुळे तापमान खाली घसरत आहे. परंतु नागपूरचा अपवाद वगळता विदर्भातील इतर जिल्ह्यातील तापमानावर मात्र याचा फारसा प्रभाव दिसून येत नाही. इतर सर्व जिल्ह्यातील तापमान सामान्यापेक्षा अधिक आहे. यात काही जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक दिसून येत आहे. तसेच वाशिम येथे किमान तापमान १७.४ अंश सेल्सिअस असून चंद्रपूर येथे १६.२ अंश, ब्रह्मपुरी १५.५ अंश व बुलडाणा येथे १५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, नागपुरात दिवसाला ऊन तापत असून, सायंकाळ होताच तापमान खाली घसरू न थंड वारे वाहू लागतात. शिवाय वातावरणात गारवा निर्माण होतो. यामुळे नागपूरकरांना पुन्हा कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागणार आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अशाच कडाक्याच्या थंडीने उपराजधानीत कहर केला होता. शहरातील किमान तापमान आठ अंश सेल्सिअसपेक्षा खाली घसरले होते. मात्र दोन दिवसाच्या थंडीनंतर पुन्हा तापमानात वाढ होउन ते सामान्य झाले होते. परंतु रविवारी पुन्हा सामान्य तापमानात घट झाली आहे. (प्रतिनिधी)