पुन्हा कोरोनाचे आठ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:12 AM2021-08-14T04:12:36+5:302021-08-14T04:12:36+5:30
नागपूर : कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. मागील ७ दिवसांत १०च्या आत रुग्ण आढळून आले आहे. शुक्रवारी पुन्हा आठ ...
नागपूर : कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. मागील ७ दिवसांत १०च्या आत रुग्ण आढळून आले आहे. शुक्रवारी पुन्हा आठ नव्या रुग्णांची भर पडली. यात ६ रुग्ण शहरातील, तर ग्रामीण व जिल्हाबाहेरील प्रत्येकी १ रुग्ण आहे. शुक्रवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. रुग्णांची एकूण संख्या ४,९२,९५९, तर मृतांची संख्या १०,११८ वर स्थिर आहे.
नागपूर जिल्ह्यात शुक्रवारी ५,१७२ तपासण्या झाल्या. यात शहरातील ३,९३३, तर ग्रामीणमधील १,२३९ संशयित नमुन्यांचा समावेश होता. शासकीय प्रयोगशाळा असलेल्या एम्स, मेडिकल, मेयो, नीरी व नागपूर विद्यापीठात तपासण्यात आलेल्या नमुन्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला नाही. खासगी प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या ८३७ नमुन्यात ५, तर अँटिजन चाचणीत ३ असे ८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. शुक्रवारी १५ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ४,८२,७१७ रुग्णांनी कोरोनावर मात केली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९२ टक्के आहे. सध्या कोरोनाचे १२४ रुग्ण सक्रिय आहेत. यातील ६३ रुग्ण होम आयसालेशनमध्ये, तर ६१ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. यात मेडिकलमध्ये १०, मेयोमध्ये ४, एम्समध्ये ३ रुग्ण असून, उर्वरित रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये आहेत.
:: कोरोनाची शुक्रवारची स्थिती
दैनिक चाचण्या : ५,१७२
शहर : ६ रु ग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : १ रुग्ण व ० मृत्यू
एकूण बाधित रुग्ण : ४,९२,९५९
एकूण सक्रिय रुग्ण : १२४
एकूण बरे झालेले रुग्ण : ४,८२,७१७
एकूण मृत्यू : १०,११८