उपराजधानीच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा
By admin | Published: December 30, 2016 02:33 AM2016-12-30T02:33:20+5:302016-12-30T02:33:20+5:30
एअर मार्शल एस. बी. देव यांची उपवायुसेना प्रमुखपदी नियुक्ती झाली असून, यासोबतच उपराजधानीच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा रोवल्या गेल्या आहे.
एअर मार्शल देव नवे उपवायुसेना प्रमुख
नागपूर : एअर मार्शल एस. बी. देव यांची उपवायुसेना प्रमुखपदी नियुक्ती झाली असून, यासोबतच उपराजधानीच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा रोवल्या गेल्या आहे. एस. बी. देव मूळचे नागपुरातील असून, ते राज्याचे महाधिवक्ता रोहित देव यांचे मोठे बंधू आहेत. विशेष म्हणजे, रोहित देव यांच्यावर नुकत्याच दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने राज्याचे महाधिवक्तापदी म्हणून धुरा दिली आहे. त्यापाठोपाठ आता एस. बी. देव यांचीही उपवायुसेना प्रमुख पदी नियुक्ती झाली आहे. ही नागपूरकरांसाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे.
एस. बी. देव मागील १९७९ पासून वायुसेनेत आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक महत्त्वाची पदे सांभाळली. सध्या ते वेस्टर्न कमांडचे प्रमुख म्हणून कार्यरत होते. तसेच त्यांनी फाईटर कॉम्बॅक्ट लीडर व टीएसीडीईमध्ये ए-२ दर्जाचे प्रशिक्षक आणि संचालक म्हणून सुद्धा जबाबदारी सांभाळली. त्यांचे शिक्षण डिफेन्स सर्व्हिसेस स्टॉफ कॉलेजमधून पूर्ण झाले.
यानंतर ते जोधपूर येथील एअर फोर्स स्टेशनमध्ये चीफ आॅपरेशन अधिकारी राहिले. शिवाय वेस्टर्न कमांडची जबाबदारी सांभाळण्यापूर्वी ते वायुसेना मुख्यालयात डायरेक्टर जनरल एअर आॅपरेशन आणि वायुसेनेच्या पूर्व कमांडमध्ये एअर कमांडिंग आॅफिसर सुद्धा राहिले आहेत.(प्रतिनिधी)