खनिकर्म महामंडळातील निविदेविरोधातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:07 AM2021-07-02T04:07:31+5:302021-07-02T04:07:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - महाजनको या वीजनिर्मिती करणाऱ्या कंपनीसाठी महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाने कोळसा पुरवठा व वॉशिंगसाठी काढलेल्या ...

Against the tender of the Mining Corporation | खनिकर्म महामंडळातील निविदेविरोधातील

खनिकर्म महामंडळातील निविदेविरोधातील

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - महाजनको या वीजनिर्मिती करणाऱ्या कंपनीसाठी महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाने कोळसा पुरवठा व वॉशिंगसाठी काढलेल्या निविदेसंदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेल्या तक्रारीचा ऊर्जा खात्याशी काहीही संबंध नसल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. या तक्रारीवरून निर्माण झालेल्या वादाबाबत प्रदेश काँग्रेसने गुरुवारी सायंकाळी हा खुलासा केला.

खनिकर्म महामंडळाने गेल्या मे महिन्यात महाजनको कंपनीसाठी नागपूरच्या रुखमाई इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीला कोळसा पुरवठा व वॉशिंगसाठी देकार पत्र दिले आहे. ही कंपनी संजय हरदवाणी चालवितात; परंतु, या कंपनीला अशा कामाचा कोणताही अनुभव नाही, कंपनीचे नेटवर्क नाही, आर्थिक उलाढाल नाही व सुरक्षेबाबतही खात्री नाही. त्यामुळे हे देकारपत्र गैरमार्गाने दिले असल्याचा संशय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्याच पक्षाच्या ऊर्जामंत्र्यांच्या खात्याविरुद्ध ही तक्रार केल्याची बातमी काही वृत्तवाहिन्यांनी दाखविल्यानंतर श्री. पटोले यांनी त्या संदर्भात खुलाशाचे निवेदन व्हिडिओद्वारे जारी केले. आपण खनिकर्म महामंडळातील निविदा प्रक्रियेची चौकशी करून तिला स्थगिती देण्याची मागणी केली असून, तिचा ऊर्जाखात्याशी संबंध जोडणे म्हणजे आपल्या काँग्रेस पक्षाचे मंत्री नितीन राऊत व आपल्यात भांडणे लावण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Against the tender of the Mining Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.