वयाच्या ५५व्या वर्षी ‘अल्झायमर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 01:25 AM2017-09-21T01:25:50+5:302017-09-21T01:26:10+5:30
ज्या लोकांचे वय ६५ वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा लोकांना अल्झायमर झाल्याचे आढळून येते. या आजाराला वैद्यकीय भाषेत ‘डेमेन्शिया’ म्हटले जाते. मानसिक प्रक्रिया मंद होत जाणारा हा आजार ....
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ज्या लोकांचे वय ६५ वर्षांपेक्षा अधिक आहे, अशा लोकांना अल्झायमर झाल्याचे आढळून येते. या आजाराला वैद्यकीय भाषेत ‘डेमेन्शिया’ म्हटले जाते. मानसिक प्रक्रिया मंद होत जाणारा हा आजार अलीकडच्या काळात ५५ ते ६० या वयोगटातही दिसून येऊ लागला आहे. याला अयोग्य जीवनशैली कारणीभूत आहे. सोबतच वैद्यकीय सोयीसुुविधा व आजाराबद्दलची जागरूकता वाढल्याने वृद्ध मोठ्या संख्येत दिसून येत आहेत. आयुष्य जेवढे वाढते, डिमेन्शियाच्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
अल्झायमर मेंदूच्या पेशी नष्ट करतो, त्यामुळे स्मृती, विचार आणि वागणूक यांच्यात इतकी तीव्र समस्या येते की काम किंवा सामाजिक जीवन विस्कळीत होते. अल्झायमर हा काळानुसार वाढतच जातो आणि तो जीवघेणा ठरतो. स्मृतिभ्रंशाचं हे सर्वात सामान्य स्वरूप आहे (स्मृती नष्ट होणे) आणि इतर बौद्धिक क्षमता इतकी समस्याग्रस्त होते की दैनंदिन जीवन गडबडून जाते. व्हिटामिन्स, मिनरर्ल्स, मेटोबॉलिझमची कमतरता किंवा अपघातामुळे मेंदूला आलेली जखम, मेंदूच्या रक्तवाहिन्यांचे आजार तसेच मेंदूच्या रक्तवाहिन्यांमधील सूक्ष्म बदल मोठ्या प्रमाणावर घडल्याने डिमेन्शिया होतो. लोकसंख्येमध्ये वृद्धांचे प्रमाण वाढतच आहे.
लठ्ठ लोकांमध्ये हा आजार सामान्य
नियमित व्यायाम केल्याने, उच्च रक्तदाब-मधुमेह-कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळविल्यास आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सोडल्यास याचा फायदा होतो. लठ्ठ लोकांमध्ये हा आजार मोठ्या संख्येत दिसून येतो. दारूचे जास्त प्रमाणात सेवनही टाळणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
अल्झायमरची लक्षणे
अलीकडेच वाचलेले लक्षात न राहणे.
दिवसभराची कामेदेखील अवघड वाटणे
घरकामातील स्वयंपाक कसा करावा यादेखील गोष्टी अवघड वाटणे
अल्झायमर असलेल्यांना अगदी सोपे शब्द किंवा त्याचे पर्यायदेखील आठवत नाहीत.
कधीकधी तोंडधुण्याच्या ब्रशला काय म्हणतात हे आठवत नाही.
अल्झायमर असणाºयांना त्यांच्या स्वत:च्या शेजारच्या घरातदेखील हरवल्यासारखे होते.
अल्झायमर असणाºयांचे कपडे घालणे बिघडते.
आकडे विसरणे व ते कसे वापरायचे ते न आठवणे.
अल्झायमर असलेल्या व्यक्ती वस्तू कुठेतरी ठेवतात व त्या नंतर शोधत राहतात.
अशा व्यक्तीचे स्वभाव अचानक बदलतात.
अल्झायमर झालेली व्यक्ती एकलकोंडी बनते, ती टीव्ही समोर तासनतास बसून राहते, झोप काढत राहते किंवा रोजची कामेदेखील व्यवस्थित करत नाहीत.