शिकण्यासाठी वयाचे बंधन नाही : दीपक कुळकर्णी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:30 AM2018-09-08T00:30:48+5:302018-09-08T00:33:24+5:30

तुम्हाला शिकण्याची आवड असेल तर वय महत्त्वाचे ठरत नाही. शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते, तुम्ही कोणत्याही वयात शिक्षणाची प्रक्रिया पूर्ण करू शकता, असे प्रतिपादन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दीपक कुळकर्णी यांनी केले.

Age limit does not have to be learned: Deepak Kulkarni | शिकण्यासाठी वयाचे बंधन नाही : दीपक कुळकर्णी 

शिकण्यासाठी वयाचे बंधन नाही : दीपक कुळकर्णी 

Next
ठळक मुद्देलोकमत प्रिंटींग प्लँट, बुटीबोरी येथे दोन दिवसीय इंडस्ट्रीयल ट्रेनिंग प्रोग्राम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तुम्हाला शिकण्याची आवड असेल तर वय महत्त्वाचे ठरत नाही. शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते, तुम्ही कोणत्याही वयात शिक्षणाची प्रक्रिया पूर्ण करू शकता, असे प्रतिपादन शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दीपक कुळकर्णी यांनी केले.
लोकमत मीडिया प्रायवेट लिमिटेड आणि  महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ टेक्निकल एज्युकेशन, नागपूर विभागीय केंद्र यांच्यावतीने लोकमत प्रिन्टींग प्लँट, बुटीबोरी येथे दोन दिवसीय इंडस्ट्रीयल ट्रेनिंग प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले. प्रोग्रामच्या उद््घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कुळकर्णी बोलत होते. ते पुढे म्हणाले, शिक्षणासाठी प्रोत्साहन आणि समर्पणाची आवश्यकता आहे.
लोकमतचे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेला मालार्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कॉर्पोरेट सोशल रिस्पान्सब्लिटी (सीएसआर) अंतर्गत आयोजित दोन दिवसीय इंडस्ट्रीयल ट्रेनिंग प्रोग्राम पॉलिटेक्निकच्या मेकॅनिकल, प्रोडक्शन, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, प्रिंटिंग अ‍ॅन्ड पॅकेजिंग इंजिनियरिंग आदी विभागांसाठी आहे. यामध्ये  महाराष्ट्रातील विविध शहराचे २९ फॅकल्टी सहभागी झाले आहेत. लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सिनियर जनरल मैनेजर (प्रोडक्शन), नागपूर डॉ. राजेंद्र पिल्लेवार यांनी ट्रेनिंग प्रोग्रामच्या पहिल्या सत्रात मार्गदर्शन केले. ते म्हणाले, १९ वे शतक उद्योगांचे, २० वे शतक माहिती व तंत्रज्ञानाचे तर २१ वे शतक हे इंडस्ट्री आणि अकॅडमिक्सला कनेक्ट करणारे आहे. इंडस्ट्री आणि अकॅडमिक्स यांना एक दुसऱ्यांकडून अनेक अपेक्षा आहेत. दोन क्षेत्रांना कनेक्ट केल्यास अनेक समस्या सहज सुटू शकतील. कार्यक्रमादरम्यान लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे गजानन शेंडे (सिनियर मॅनेजर प्रोडक्शन), आनंद नानकर (मॅनेजर मेकॅनिकल), नरेश राऊत (मॅनेजर इलेक्ट्रिकल) प्रामुख्याने उपस्थित होते. आर.आर. तायडे या कार्यक्रमाच्या समन्वयक होत्या. कार्यक्रमाचे संचालन एचआर एक्झिक्यूटिव्ह सुनील कोंगे यांनी केले.

Web Title: Age limit does not have to be learned: Deepak Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.