एजंट जॅक बारला ३० हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:07 AM2021-06-28T04:07:19+5:302021-06-28T04:07:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उंटखाना मेडिकल चौकातील ट्रिलियम मॉलमध्ये असलेल्या एजंट जॅक बार येथे कोविड नियमांचे उल्लंघन ...

Agent Jack Barr fined Rs 30,000 | एजंट जॅक बारला ३० हजारांचा दंड

एजंट जॅक बारला ३० हजारांचा दंड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : उंटखाना मेडिकल चौकातील ट्रिलियम मॉलमध्ये असलेल्या एजंट जॅक बार येथे कोविड नियमांचे उल्लंघन करून ग्राहकांची गर्दी जमवल्याने मनपाच्या धंतोली झोनचे उपद्रव शोध पथक आणि इमामवाडा पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत बारमालकाला ३० हजारांचा दंड ठोठावला. शनिवारी रात्री ९.२० वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

बारमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळताच इमामवाडा पोलिसांच्या सहकार्याने उपद्रव शोध पथकाने एज़ंट जॅक बारमध्ये धडक दिली. यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात युवक आढळून आले. १०० हून अधिक युवकांची संख्या होती. सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे तेथे बघायला मिळाले. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बार मालकाने स्वतंत्र कुठलीही व्यवस्था केलेली नव्हती. झोनच्या सहायक आयुक्त किरण बगडे यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथकाने बारमालकावर दंड ठोठावला. धंतोली झोन पथक प्रमुख नरहरी बिरकड, दिनेश सहारे, हिरानाथ मालवे, सुशील लांडगे, चालक रजत तसेच इमामवाडा ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करत कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तर धोका अजून टळलेला नाही. असे असतानाही अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. असे करणे टाळा. नियमांचे पालन करा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Web Title: Agent Jack Barr fined Rs 30,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.