वृद्धाच्या हत्येने यशोधरानगरात थरार, कपाळावर वार, आरोपी फरार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2017 10:40 PM2017-11-11T22:40:28+5:302017-11-11T22:40:38+5:30

फुटपाथवर राहणा-या वृद्धाची डोक्यावर घाव घालून हत्या करण्यात आल्यामुळे यशोधरानगरात थरार निर्माण झाला आहे.

Aggrieved in the murder of old man, a thunder on the brow, the accused escaped | वृद्धाच्या हत्येने यशोधरानगरात थरार, कपाळावर वार, आरोपी फरार 

वृद्धाच्या हत्येने यशोधरानगरात थरार, कपाळावर वार, आरोपी फरार 

Next


नागपूर - फुटपाथवर राहणा-या वृद्धाची डोक्यावर घाव घालून हत्या करण्यात आल्यामुळे यशोधरानगरात थरार निर्माण झाला आहे. मोहम्मद सलीम मोहम्मद अनिस (वय ६५) असे मृताचे नाव आहे.ताजनगर टेकानाका भागात राहणा-या मोहम्मद सलीमला दोन मुले आणि दोन भाऊ आहेत. सर्व वेगवेगळे राहतात. त्याला दोन बायका होत्या. त्यांचा मृत्यू झाल्यानंतर मुलांसोबत पटेनासे झाल्याने सलीम घराबाहेर पडले. ते कचरा वेचून आपल्या पोटाची खळगी भरत होते. रोज रात्री ते एकतानगरातील मीत मार्केटमध्ये रजा बॅग सेंटरच्या शेडसमोर झोपायचे. 

शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे ते झोपले. आज सकाळी त्यांचा मृतदेह आढळला. त्यांच्या कपाळावर मोठी जखम होती आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहिल्यामुळे डोक्याखाली रक्ताचे थारोळे साचले होते. ही माहिती कळताच यशोधरानगरचे ठाणेदार पुंडलीक मेश्राम आपल्या सहका-यांसह घटनास्थळी धावले. त्यांनी मृतदेहाची ओळख पटल्यानंतर सलीमचा भाऊ मोहम्मद खालिद यांना बोलवून घेतले. त्यानंतर आरोपींबाबत ईकडे तिकडे विचारणा केली. वृद्धाची हत्या झाल्याचे कळाल्याने परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. मध्यरात्रीपर्यंत सलीम चांगले होते, असे सांगण्यात आले. कचरा वेचणाराचे कुणाशी काय वैमनस्य असू शकते, असा प्रश्न पुढे आला आहे. खालिदच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. 

ऑटोवाल्याचा संशय
घटनेच्या पुर्वी तेथे बराचवेळेपासून एक आॅटोवाला उभा होता. मध्यरात्रीनंतर तो तेथून निघून गेला. त्यामुळे त्यानेच रागाच्या भरात सलीमची हत्या केली की काय, अशी शंका उपस्थित झाली असून, पोलीस त्या आॅटोचालकाचा शोध घेत आहेत.

Web Title: Aggrieved in the murder of old man, a thunder on the brow, the accused escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.