सबको सन्मति दे भगवान.... म्हणत राष्ट्रवादीने दिले धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2022 08:38 PM2022-04-09T20:38:14+5:302022-04-09T20:38:51+5:30
Nagpur News संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या घरावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे व्हेरायटी चौकात धरणे देण्यात आले.
नागपूर : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या घरावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे व्हेरायटी चौकात धरणे देण्यात आले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर बसून ‘रघुपति राघव राजा राम...सबको सन्मति दे भगवान’हे भजन गात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला.
शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने निषेधाचे फलक घेऊन सहभागी झाले. शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला ही महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी घटना असून यामागील मास्टर माईंडवर कडक कारवाई करावी, अशी मागणी दुनेश्वर पेठे यांनी केली. महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे यांच्या नेतृत्वात इतवारीच्या चितार ओळ चौकातील गांधी पुतळ्याजवळ मूक निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनामध्ये माजी आ. दीनानाथ पडोले, अनिल अहिरकर, बजरंग परिहार, शेखर सावरबांधे, प्रवीण कुंटे, रमण ठवकर, जानबाजी मस्के, प्रशांत पवार, वर्षा श्यामकुळे, जावेद हबीब, रमेश फुले, लक्ष्मी सावरकर, शैलेंद्र तिवारी, नूतन रेवतकर, संतोष सिंह, गुलशन मुनियार, रविनीश पांडे, महेंद्र भांगे, रवींद्र इटकेलवार आदींनी भाग घेतला.