एकनाथ निमगडे हत्या प्रकरण: राष्ट्रवादीचा गंभीर आरोप; देवेेंद्र फडणवीसांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 12:02 PM2021-03-24T12:02:51+5:302021-03-24T15:08:00+5:30

Crime News : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांच्या नेतृत्वात बुधवारी सकाळी विरोधी पक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी आंदोलन करण्यात आले.

Agitation near Devendra Fadnavis's residence; The statue burned | एकनाथ निमगडे हत्या प्रकरण: राष्ट्रवादीचा गंभीर आरोप; देवेेंद्र फडणवीसांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा दावा

एकनाथ निमगडे हत्या प्रकरण: राष्ट्रवादीचा गंभीर आरोप; देवेेंद्र फडणवीसांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा दावा

Next
ठळक मुद्देपोलिसांनी वेदप्रकाश आर्य, वर्षा श्यामकुळे, महेंद्र भांगे, शैलेंद्र तिवारी यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या धरपेठ येथील निवासस्थानाजवळ आंदोलन छेडले आहे. आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी वेदप्रकाश आर्य, वर्षा श्यामकुळे, महेंद्र भांगे, शैलेंद्र तिवारी यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

कहानी पुरी फिल्मी है....तपास सीबीआयकडे : छडा लावला पोलिसांनी

बहुचर्चित एकनाथ निमगडे हत्याकांडातील मोस्ट वाँटेड गुन्हेगार नब्बू उर्फ छोटे नवाब आणि कालू उर्फ शरद तसेच भरत हाटे या तिघांच्या मुसक्या बांधण्याची प्रशंसनीय कामगिरी नागपूर पोलिसांनी बजावली. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. कोट्यवधीच्या जमिनीच्या वादातून आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांची हत्या करण्यासाठी गँगस्टर रंजीत सफेलकर याने पाच कोटींची सुपारी घेतली. सफेलकरने त्याचा राईट हॅण्ड कालू उर्फ शरद घाटे याच्यामार्फत ही सुपारी पावणेदोन कोटी रुपयांत नब्बू या कुख्यात गुंडाला पलटविली. नब्बूने शहाबाज नामक गुंडाच्या मदतीने मध्य प्रदेशातील सुपारी किलर राजा तसेच बाबा आणि उत्तर प्रदेशातील शूटर परवेज या तिघांना पन्नास लाखांत हायर केले. त्यानंतर ६ सप्टेंबर २०१६ ला सकाळी ७ च्या सुमारास राजा, परवेज आणि बाबाने निमगडे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

प्रथम स्थानिक पोलीस आणि नंतर सीबीआयकडून या खळबळजनक हत्याकांडाचा तपास झाला. मात्र आरोपींचा छडा लावण्यात त्यांना यश आले नाही. परंतु पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी अनडिटेक्ट मर्डरच्या यादीत वरच्या स्थानावर असलेल्या निमगडे हत्याकांडाचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके कामी लावली. त्यानंतर महिनाभरापूर्वी या हत्याकांडातील आरोपींची नावे अधोरेखित केली. दरम्यान, आपल्या आजूबाजूचे आरोपी पोलिसांनी उचलल्याचे लक्षात येताच गँगस्टर सफेलकर, कालू हाटे आणि नब्बू हे तिघेही फरार झाले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांना ही माहिती दिली. दरम्यान, या हत्याकांडाचा छडा लागल्यापासून गँगस्टर सफेलकर, हाटे, नब्बू, राजा, बाबा आणि परवेज या सहा जणांचा पोलीस अविश्रांत शोध घेत होते. या पार्श्वभूमीवर, कालू हाटे राजस्थानमधील अजमेर येथे दडून बसला असल्याची माहिती कळताच गुन्हे शाखेचे पथक तिकडे पाठविण्यात आले. सोमवारी रात्री एका हॉटेलमध्ये छापा मारून या पथकाने कालू हाटेसोबतच त्याचा भाऊ भरत हाटे या दोघांच्या मुसक्या बांधल्या. दुसरीकडे मध्य प्रदेशातील शिवनीजवळ लपून बसलेल्या कुख्यात नब्बूच्याही मुसक्या आवळण्यात आल्या.

Web Title: Agitation near Devendra Fadnavis's residence; The statue burned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.