पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; सरकारविरोधात विधान परिषदेच्या आमदारांचे धरणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 14:11 IST2022-12-29T14:09:18+5:302022-12-29T14:11:37+5:30
सरकारविरोधात विधान परिषदेच्या आमदारांचे धरणे

पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; सरकारविरोधात विधान परिषदेच्या आमदारांचे धरणे
नागपूर : जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करण्यात आले. यावेळी पेन्शन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची अशा घोषणा करीत विधान परिषदेच्या आमदारांनी सरकारच्या विरोधात धरणे दिले.
विधिमंडळ अधिवेशनाचा आजचा नववा दिवस आहे. राज्यातील शिक्षक आणि प्राध्यापकांची रिक्त पदे भरावी. त्रुट्या पूर्ण केलेल्या शाळांना वाढीव अनुदान द्यावे. केंद्रीय आश्रम शाळांचे प्रलंबित अनुदान ताबडतोब द्यावे, यासह अन्य मागण्या यावेळी आमदारांनी लावून धरल्या. या आंदोलनात आमदार डॉ. सुधीर तांबे, विक्रम काळे, जयंत आसगावकर, किरण सरनाईक, सतीश चव्हाण, अरुण लाड आदि सहभागी झाले होते.