चक्क रस्त्यावरील खड्ड्यात बसून केले आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 08:23 PM2020-08-28T20:23:49+5:302020-08-28T20:25:21+5:30
वाठोडा रिंग रोडजवळ संघर्षनगर ते भांडेवाडी डम्पिंग यार्डपर्यंत रस्त्याची प्रचंड दैनावस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे पडले असून त्यात रस्ता शोधावा लागतो. गाडी चालविणे सोडा, पायी चालणेही अतिशय कठीण जात आहे. पावसाळ्यात या खड्ड्यामध्ये तलावाप्रमाणे पाणी साचले आहे. या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यातील चिखलात बसून आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाठोडा रिंग रोडजवळ संघर्षनगर ते भांडेवाडी डम्पिंग यार्डपर्यंत रस्त्याची प्रचंड दैनावस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे पडले असून त्यात रस्ता शोधावा लागतो. गाडी चालविणे सोडा, पायी चालणेही अतिशय कठीण जात आहे. पावसाळ्यात या खड्ड्यामध्ये तलावाप्रमाणे पाणी साचले आहे. या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यातील चिखलात बसून आंदोलन केले.
प्रभाग २६ वाठोडा अंतर्गत संघर्षनगर ते भांडेवाडी रोडवरील जड वाहनांमुळे रस्ता खराब झाल्यामुळे, सामान्य नागरिकांना रस्त्यावरून पायी चालणाऱ्या लोकांना खूप त्रास होत आहे. शहर सचिव गौरव गुप्ता यांच्या नेतृत्वात नारे निदर्शने, शांततेत आंदोलन करण्यात आले. यावेळी योगेश नान्याखोर, युवासेनेचे जिल्हा प्रमुख हितेश यादव, रूपेश बागडे, शशिधर तिवारी, आकाश पांडे, हृषिकेश जाधव, पवन घुघुस्कर, अविनाश पांडे, शंकर बनारसे, शुभम भोयर, इरफान खान, प्रीतम खलोडे, योगेश ठोकर, तुळशीराम टेमेकर, अशोक शिवाशंकर आदी उपस्थित होते.