बन्सोड हत्येप्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 12:09 AM2020-07-18T00:09:25+5:302020-07-18T00:11:05+5:30

नरखेड तालुक्याच्या नाथपवनी या गावातील उच्च शिक्षित सामाजिक कार्यकर्ते अरविंद बन्सोड यांच्या हत्येच्या प्रकरणाचा सीबीआयमार्फत तपास करण्यात यावा, अशी मागणी संघर्ष समितीतर्फे करण्यात येत आहे. या मागणीसाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी संविधान चौक येथे धरणे आंदोलन केले.

Agitations for CBI probe into Bansod murder case | बन्सोड हत्येप्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन

बन्सोड हत्येप्रकरणी सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन

Next

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : नरखेड तालुक्याच्या नाथपवनी या गावातील उच्च शिक्षित सामाजिक कार्यकर्ते अरविंद बन्सोड यांच्या हत्येच्या प्रकरणाचा सीबीआयमार्फत तपास करण्यात यावा, अशी मागणी संघर्ष समितीतर्फे करण्यात येत आहे. या मागणीसाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी संविधान चौक येथे धरणे आंदोलन केले. जातीय द्वेषातून राजकीय वरदहस्त असलेल्या लोकांद्वारे हत्या करण्यात आल्याचा आरोप या आंदोलनादरम्यान करण्यात आला. राजकीय दबावाला बळी पडून स्थानिक पोलीस प्रशासनही या सुनियोजित हत्याकांडाच्या तपासाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या प्रकरणाचा सीबीआयमार्फत तपास करून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात भन्ते अभयनायक, भन्ते हर्षदीप, गौतमी आर्याअर्जुन, पारमिता, संजय पाटील, राहुल मून, प्रा. राजेंद्र टेंभुर्णे, घनश्याम फुसे, निरंजन वासनिक, अ‍ॅड. सुरेश घाटे, संजय जीवने, आनंद पिल्लेवान, माधुरी गायधनी, प्रा. संध्या राजुरकर, रिता बागडे, स्मिता बडगे, विश्वास पाटील, सुनील जवादे, नागसेन बडगे, नीलेश भिवगडे, श्रीकांत फुले, संदीप वाघमारे, आशिष फुलझेले आदींचा सहभाग होता.

Web Title: Agitations for CBI probe into Bansod murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.