जिल्हा परिषदेतर्फे कृषी मेळावा व प्रदर्शन; कृषी तज्ज्ञ करणार  शेतकऱ्यांना मार्गदर्शन

By गणेश हुड | Published: June 13, 2023 06:53 PM2023-06-13T18:53:20+5:302023-06-13T18:53:48+5:30

Nagpur News जिल्हा परिषदेतर्फे सावनेर येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्हास्तरीय कृषि-पशुपक्षी मेळावा व प्रदर्शनीचे उद्या १४ जून रोजी आयोजन करण्यात आले आहे.

Agricultural Fair and Exhibition organized by Zilla Parishad; Agricultural experts will guide the farmers | जिल्हा परिषदेतर्फे कृषी मेळावा व प्रदर्शन; कृषी तज्ज्ञ करणार  शेतकऱ्यांना मार्गदर्शन

जिल्हा परिषदेतर्फे कृषी मेळावा व प्रदर्शन; कृषी तज्ज्ञ करणार  शेतकऱ्यांना मार्गदर्शन

googlenewsNext

गणेश हूड

 नागपूर  : जिल्हा परिषदेतर्फे सावनेर येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये जिल्हास्तरीय कृषि-पशुपक्षी मेळावा व प्रदर्शनीचे उद्या १४ जून रोजी आयोजन करण्यात आले आहे. या प्रर्दशनी मध्ये शेतकऱ्यांना  बि-बियाणे, किटकनाशके, कृषि अभियांत्रीकीकरण अवजारे, सोलार कुपंन, सोलार पंप, पाईप, मोटर पंप, यासह  विविध विषयावर कृषि तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. 


मेळावा व प्रदर्शनीमुळे ग्रामीण भागातील जनतेला वेगवेगळया जातीचे पशुपक्षी पालनाबाबत माहिती व  पशुपक्षी पालन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शेतक-यांनी पारंपारीक शेती सोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची  कास धरुन शेती  करण्याबाबतची  संकल्पना ठेवण्यात आली आहे. त्यानुसार प्रदर्शनामध्ये विविध प्रात्याक्षिक, प्रारूप व शासकीय योजनांची माहिती सादर केली जाणार आहे. या प्रदशर्नी मध्ये विविध जातींची जनावरे, शेतीसाठी उपयुक्त साहित्य व विविध उत्पादने असणारे जवळपास २००  स्टॉल राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे  व उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी दिली. 


महिलांनी तयार केलेल्या उत्पादनला या ठिकाणी थेट बाजारपेठ मिळवुन देण्याकरीता जिल्हा परिषद महिला बचत गटांचे स्टॉल लावण्यात येणार आहे. याप्रदर्शनीचा मोठया प्रमाणात फायदा   शेतक-यांना होणार आहे.  प्रदर्शनीचा व मेळाव्याचा लाभ ग्रामीण भागातील सर्व शेतकरी व नागरीकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Agricultural Fair and Exhibition organized by Zilla Parishad; Agricultural experts will guide the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.