पावसाच्या असमतोलाने बिघडविले शेतीचे गणित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:11 AM2021-09-05T04:11:41+5:302021-09-05T04:11:41+5:30
राज्यातील पीक परिस्थिती नाशिक विभाग : १९.७६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मका व ज्वारीवर लष्करी अळी, सोयाबीनवर ...
राज्यातील पीक परिस्थिती
नाशिक विभाग :
१९.७६ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मका व ज्वारीवर लष्करी अळी, सोयाबीनवर खोडमाशी, अमेरिकन बोंड अळी, पाने खाणाऱ्या अळींचा तसेच उंट अळी, कापसावर मावा, तुडतुडे, गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आहे.
पुणे विभाग :
७.९३ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग आणि महापुराने पिकांचे प्रचंड नुकसान. मका पिकावर लष्करी अळी, ज्वारीवर खोडकीड, उसावर हुमणी व लोकरी मावा. भुईमूग पिकावर हुमणी व तांबेरा रोग तसेच सोयाबीनवर चक्रीभुंगा, पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव.
औरंगाबाद विभाग :
२७.३० लाख हेक्टरवर पीक पेरणी. परभणी व हिंगोली जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान. मका पिकावर लष्करी अळी, कापूस पिकावर मावा, तुडतुडे, गुलाबी बोंड अळी. सोयाबीनवर खोडकीड, उंट अळी, चक्रीभुंगा. तंबाखूवर पाने खाणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव.
अमरावती विभाग :
३१.४५ लाख हेक्टरवर पीक पेरणी. अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे नुकसान. कापसावर मावा, तुडतुडे, गुलाबी बोंड अळी, सोयाबीनवर उंट अळी, चक्रीभुंगा, खोडमाशी. येलो वहेन मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव.
नागपूर विभाग :
पीक पेरणी क्षेत्र १९.११ लाख हेक्टर. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान. भाताचे क्षेत्र घटले. या पिकावर पिवळी खोडकीड, गाद माशी. कापसावर गुलाबी बोंड अळी, पांढरी माशी, मावा, तुडतुडे. सोयाबीनवर मावा, तुडतुडे, उंट अळी, खोडमाशीचा प्रादुर्भाव. दमट वातावरण, पावसाचा अयोग्य निचरा यामुळे संत्रा आणि मोसंबीची फळगळ मोठ्या प्रमाणात सुरू.
...................
कोट (हवामान खात्यातील वरिष्ठ अधिकारी)
यंदा अंदाज चुकले. मान्सून ब्रेक झाला. सामान्यापेक्षा बंगालच्या खाडीत महिन्यात किमान चार वेळा दबाव निर्माण होतो. यावेळी महिन्यातून दोन वेळाच निर्माण झाला. इंडियन ओशन ड्रायकोल्ड निगेटिव्ह असल्याने पाऊस कमी झाला. अद्यापही तो निगेटिव्हच आहे. बंगालच्या खाडीत ५ सप्टेंबरनंतर कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल, त्यामुळे सप्टेंबरमध्ये पाऊस चांगला राहील.
- दामोदर पायी
प्रमुख, क्लायमेट रिसर्च अँड सर्व्हिसेस, आयएमडी, पुणे
....................
कोट (शासकीय सेवेत नसलेल्या हवामान तज्ज्ञ)
अलीकडे जमिनीचे तापमान अनिश्चित झाले आहे. कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर निर्माण व्हायला हवे. ते बदलत असल्याने जमिनीवर पाऊस पडायला आर्द्रता तयार होत नाही. शहरीकरण, निर्वणीकरण, प्रदूषण वाढीमुळे भिन्न तापमानाचे क्षेत्र तयार झाले.
- सुरेश चोपणे
पर्यावरण अभ्यासक तथा अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी
........................