कृषिमंत्री अब्दुल सत्तार शुक्रवारी घेणार पूरग्रस्त विदर्भाचा आढावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2022 07:27 PM2022-08-18T19:27:18+5:302022-08-18T19:30:03+5:30

Nagpur Newsकृषिमंत्री अब्दुल सत्तार हे विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान, उद्या शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात ते विभागातील कृषी विभागाचा आढावा घेतील.

Agriculture Minister Abdul Sattar will review the flood affected Vidarbha on Friday | कृषिमंत्री अब्दुल सत्तार शुक्रवारी घेणार पूरग्रस्त विदर्भाचा आढावा 

कृषिमंत्री अब्दुल सत्तार शुक्रवारी घेणार पूरग्रस्त विदर्भाचा आढावा 

googlenewsNext

नागपूर : कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान, उद्या शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात ते विभागातील कृषी विभागाचा आढावा घेतील. त्यानंतर ते पांझलीबोधी व वारंगा येथील अतिवृष्टीने बाधित पिकांची पाहणी करतील. त्यानंतर ते वर्धेकडे प्रयाण करतील.

अतिवृष्टीमुळे नागपूर विभागाला मोठा फटका बसला आहे. नुकतेच केंद्रीय पथक विभागाच्या दौऱ्यावर येऊन गेले आहे. त्यांनी पाहणी केली. त्यानंतर येथील पिकांच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवण्यात आला आहे. केंद्राचे पथक पुन्हा एकदा पाहणी करण्यासाठी येणार आहे. दरम्यान, झालेल्या नुकसानीपेक्षा कितीतरी कमी नुकसान दाखवण्यात आल्याची ओरड केली जात आहे. कृषिमंत्री या आढावा बैठकीत या सर्वांचा आढावा घेणार असल्याचे सांगितले जाते. यानंतर ते अमरावती विभागाचाही आढावा घेणार आहेत.

Web Title: Agriculture Minister Abdul Sattar will review the flood affected Vidarbha on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.