भारताचे कृषी मंत्री आज वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:54 PM2017-12-16T23:54:55+5:302017-12-16T23:56:03+5:30

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंग हे खास वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी रविवारी नागपुरात येणार आहेत. ते दुपारी २ वाजता फेस्टिव्हलमधील शेतकऱ्यांना विविध मुद्यांवर विशेष मार्गदर्शन करणार आहेत.

Agriculture Minister of India today at the World Orange Festival | भारताचे कृषी मंत्री आज वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये

भारताचे कृषी मंत्री आज वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये

googlenewsNext
ठळक मुद्देराधा मोहन सिंग शेतकऱ्यांना विविध मुद्यांवर विशेष मार्गदर्शन करणार

आॅनलाईन लोकमत
नागपूर : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंग हे खास वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी रविवारी नागपुरात येणार आहेत. ते दुपारी २ वाजता फेस्टिव्हलमधील शेतकऱ्यांना विविध मुद्यांवर विशेष मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात होईल.
सिंग हे दिल्ली येथून नागपुरात येणार आहेत. दुपारी १२.१० वाजता त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल. विमानतळावरून ते दुपारी १२.३० वाजता सर्किट हाऊस येथे जातील. त्यानंतर ते दुपारी २ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहातील वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तेथून ते दुपारी ३.१५ वाजता सर्किट हाऊस येथे परत जातील. दुपारी ४.३० वाजता सिव्हिल लाईन्स येथील रामगिरी (मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान) बंगल्यात त्यांची भारतीय कृषी संशोधन परिषदेचे अधिकारी आणि बियाणे व कीटकनाशकांशी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक होईल. त्यानंतर ते याच ठिकाणी महाराष्ट्रातील कापूस पिकाशी संबंधित विषयावर दुसरी बैठक घेतील. येथून ते नागपूर विमानतळावर जातील व सायंकाळी ७.५० वाजता विमानाने दिल्लीला रवाना होतील. त्यांना ‘झेड’ दर्जाची सुरक्षा पुरविली जाणार आहे.

Web Title: Agriculture Minister of India today at the World Orange Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.