काचूरवाही येथे कृषी संजीवनी सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:07 AM2021-06-25T04:07:27+5:302021-06-25T04:07:27+5:30
रामटेक : कृषी विभागातर्फे संपूर्ण राज्यात राबविला जात असलेल्या कृषी संजीवनी सप्ताहाला काचूरवाही येथून प्रारंभ झाला. रामटेक तालुक्यातील काचूरवाही, ...
रामटेक : कृषी विभागातर्फे संपूर्ण राज्यात राबविला जात असलेल्या कृषी संजीवनी सप्ताहाला काचूरवाही येथून प्रारंभ झाला. रामटेक तालुक्यातील काचूरवाही, खंडाळा, वडेगाव, किरणापूर, खाेडगाव तसेच आदिवासीबहुल भागातील शेतकऱ्यापर्यंत पाेहाेचून कृषी संजीवनी माेहिमेंतर्गत जमीन सुपिकता निर्देशांकानुसार रासायनिक खताचा वापर कसा आणि किती प्रमाणात करावा तसेच जमिनीच्या मगदूराप्रमाणे रासायनिक खतांबराेबर सेंद्रिय खते, ढेंचा, बाेरू, अझाेला साेबतच नत्र स्थिर करणारे जिवाणू संवर्धक तसेच हिरवळीच्या खताचा वापर करून उत्पादन कसे वाढविता येईल, याबाबत कृषी सहायक नारायण ताेडमल यांनी मार्गदर्शन केले. कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध याेजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी मिरची उत्पादक शेतकरी रमेश नाटकर, जितेंद्र गाेल्हर, आसाराम नाटकर, लहू बावनकुळे, शुभम कामळे, आशिष बावनकुळे, अविनाश बावनकुळे, गजानन भलमे, गणेश गाेल्हर आदी उपस्थित हाेते.