२१ जूनपासून राबविणार कृषी संजीवनी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:09 AM2021-06-16T04:09:35+5:302021-06-16T04:09:35+5:30
नागपूर : आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागाने राज्यात कृषी संजीवनी मोहीम आखली आहे. राज्यात २१ जून ते १ ...
नागपूर : आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागाने राज्यात कृषी संजीवनी मोहीम आखली आहे. राज्यात २१ जून ते १ जुलै या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या या योजनेंतर्गत नागपूर विभागातही उपक्रम राबविले जाणार आहेत.
या मोहिमेच्या कालावधीत कार्यालयीन दिवशी महत्वाचे तंत्रज्ञान व मोहिमांवर विशेष भर दिला जाणार असून प्रचार, प्रसार व प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी कळविले आहे. कृषी दिनाचे औचित्य साधून १ जुलैला मोहिमेचा समारोप होणार आहे.
कृषी योजनांची माहिती व्हॉटस्ॲपवर मिळण्यासाठी ऑटो रिप्ले सुविधा विकसित करण्यात आली आहे. व्हॉटस्ॲपवर योजनेची माहिती मिळण्यासाठी ९१८०१०५५०८७० या क्रमांकावर keywords असे टाईप केल्यास त्या योजनांची माहिती मिळणार आहे. कृषी विभागाच्या यू ट्युब चॅनलवरही ही माहिती प्राप्त होणार आहे.
...
असे आहेत उपक्रम
२१ जून : बी.बी. एफ लागवड तंत्रज्ञान (रुंद वरंबा सरी तंत्रज्ञान)
२२ जून : बीजप्रक्रिया मार्गदर्शन
२३ जून : जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर
२४ जून : कापूस ‘एक गाव एक वाण’, भात क्षेत्रात सुधारित भात लागवड, कडधान्य क्षेत्रात आंतरपीक तंत्रज्ञान
२५ जून : विकेल ते पिकेलसाठी जनजागृती
२८ जून : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार
२९ जून : तालुक्यातील दोन पिकात उत्पादकता वाढ करण्यासाठी रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा सहभाग
३० जून : महत्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना
१ जुलै : कृषी दिन आणि मोहिमेचा समारोप
...