नागपुरात 'ॲग्रो कन्व्हेंशन सेंटर' उभारण्यात येणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By आनंद डेकाटे | Published: August 16, 2023 04:42 PM2023-08-16T16:42:35+5:302023-08-16T16:44:31+5:30

एक हजार एकरवर 'लॉजिस्टीक पार्क'

'Agro Convention Center' will be set up in Nagpur - Dy CM Devendra Fadnavis | नागपुरात 'ॲग्रो कन्व्हेंशन सेंटर' उभारण्यात येणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपुरात 'ॲग्रो कन्व्हेंशन सेंटर' उभारण्यात येणार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

googlenewsNext

नागपूर :नागपूरचा चेहरा मोहरा बदलण्याच्या दृष्टीने जोमाने कामे होत आहेत. २२७ कोटी रुपयांच्या खर्चातून शहरात 'ॲग्रो कन्व्हेंशन सेंटर' उभारण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गामुळे विदर्भ व नागपूरचा विकास साधला जात आहे. नागपूर शहरात जवळपास १ हजार एकरावर अत्याधुनिक सुविधा युक्त 'लॉजिस्टीक पार्क' उभारण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनाचा सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त अमीतेश कुमार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, विविध पुरस्कार विजेत्यांसह मान्यवर, अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 शहराची आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी आणि गोरगरिबांना उत्तम आरोग्य सेवा पुरविण्यासाठी कार्य सुरु आहे. याअंतर्गत ७६ वर्ष जुन्या नागपूर वैद्यकीय महाविद्यालयाचे उन्नतीकरण करण्यासाठी ५२५ कोटींचा निधी देण्यात आला आहे. यातील १७२ कोटींच्या कामांचे भूमीपूजन पार पडले असून लवकरच १४२ कोटींच्या कामांचीही सुरुवात होणार आहे. मेयो रुग्णालयातील सेवा अधिक बळकट करण्यासाठी ३५० कोटींच्या कामांना सुरुवात होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सिकलसेलच्या उच्चाटनासाठी देशभर कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत १ लाख रुग्णांचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे.

नळगंगा आणि वैनगंगा प्रकल्प सद्या मंजुरीच्या शेवटच्या टप्पात असून या प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भातील दुष्काळी भागासह सर्व जिल्हे जलयुक्त करण्यात येणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात स्टील उद्योगाद्वारे २० हजार कोटींची गुंतवणूक आली आहे. येत्या काळातही याच उद्योगात १ लाख कोटींची गुंतवणूक होणार असल्याचे सकारात्मक चित्र असल्याचे त्यांनी सांगितले. देशाच्या अर्थव्यवस्थेत १ ट्रीलियन डॉलरचे योगदान देण्याचा प्रण असून देश व महाराष्ट्रातील जनतेला न्याय देणारी अर्थव्यवस्था उभारू, असा विश्वासही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: 'Agro Convention Center' will be set up in Nagpur - Dy CM Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.