‘अहिंसा के रास्ते’ जनजागृती शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:10 AM2021-01-20T04:10:52+5:302021-01-20T04:10:52+5:30
रेवराल : नेरला (ता. माैदा) येथील ग्रामपंचायत कार्यालयात ‘अहिंसा के रास्ते’ या जनजागृती प्रशिक्षण शिबिराचे नुकतेच आयाेजन करण्यात आले ...
रेवराल : नेरला (ता. माैदा) येथील ग्रामपंचायत कार्यालयात ‘अहिंसा के रास्ते’ या जनजागृती प्रशिक्षण शिबिराचे नुकतेच आयाेजन करण्यात आले हाेते. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून शिबिराला प्रारंभ करण्यात आला. या शिबिरात ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व नागरिकांना महात्मा गांधी, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील भारत, स्व. राजीव गांधी यांचे आधुनिक भारताच्या निर्मितीतील याेगदान, पंचायत राज व्यवस्था, ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य व नागरिकांचे अधिकार, भारतीय संविधान यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर विस्तृत मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराचे आयाेजन राेशन मेश्राम यांनी केले हाेते. त्यांनीच मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. याप्रसंगी नेरलाचे सरपंच मोमदेव देशमुख, उपसरपंच मनोज कडू, ग्रामविकास अधिकारी सुभाष कुबडे, ग्रामपंचायत सदस्य दीपक लेंडे, सुधांशु खोब्रागडे, रोजगारसेवक भोलेशंकर मनगटे, अभिजित वानखेडे, सरजू शिंदे, नरेश खोब्रागडे, तुळशीराम लेंडे, राजेश गेडाम, सूर्यभान नेवारे, कौसल्या गेडाम, तुळसा कडू यांच्यासह नागरिक उपस्थित हाेते.