अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करणार - दीपक केसरकर

By योगेश पांडे | Published: December 28, 2022 05:21 PM2022-12-28T17:21:08+5:302022-12-28T17:22:02+5:30

जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागविला : कॅबिनेटची मंजुरी घेऊन केंद्राकडे पाठविणार

Ahmednagar will be named as Punyashlok Ahilya Devinagar says minister Deepak Kesarkar | अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करणार - दीपक केसरकर

अहमदनगरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर करणार - दीपक केसरकर

Next

नागपूर :अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर’ करण्याबाबत राज्य सरकारची भूमिका सकारात्मक आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आला आहे. याला कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतर केंद्राकडे तातडीने प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती राज्य शासनातर्फे मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. यासंदर्भात विधानपरिषदेत गोपीचंद पडळकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अहमदनगर नामांतरासाठी विभागीय आयुक्त नाशिक आणि जिल्हाधिकारी अहमदनगर यांना परिपूर्ण प्रस्ताव, माहिती पाठविण्यास कळविले आहे. शिवाय अहमदनगर महापालिका, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पोस्ट कार्यालय, तहसीलदार यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत कळविण्यात आले आहे. सर्व परिपूर्ण माहिती आल्यानंतर हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले

Web Title: Ahmednagar will be named as Punyashlok Ahilya Devinagar says minister Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.