एड्सविषयक जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:08 AM2020-12-08T04:08:01+5:302020-12-08T04:08:01+5:30
कुही : जागतिक एड्स निर्मूलन सप्ताहानिमित्त मांढळ येथील लेमदेव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा याेजना विभागातर्फे जनजागृती कार्यक्रम पार पडला. ...
कुही : जागतिक एड्स निर्मूलन सप्ताहानिमित्त मांढळ येथील लेमदेव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा याेजना विभागातर्फे जनजागृती कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी लैंगिक शिक्षण तज्ज्ञ व भारतीय वैद्यकीय संघटना नवी दिल्लीचे सदस्य डॉ. संजय देशपांडे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष डाॅ. चक्रधर तितरमारे हाेते. यावेळी डॉ. मंजुषा गिरी, डॉ. रफत खान उपस्थित होते. जगासह देशात एड्सचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत असून, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी एचआयव्ही उपचार केंद्राची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे मत डाॅ. संजय देशपांडे यांनी मांडले. डॉ. मंजुषा गिरी, डॉ. रफत खान यांनी लैंगिक शिक्षणासह कोरोनाच्या आरोग्याच्या संदर्भात घ्यावयाची काळजी यावर प्रकाश टाकला. प्राचार्य डॉ. प्रदीप रणदिवे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. अविनाश तितरमारे यांनी प्रास्ताविक केले. संचालन डॉ. महेश गायधने यांनी तर डाॅ. स्मिता खरकाळे यांनी आभार मानले.