माता व बालमृत्यू रोखण्यासाठी ‘एम्स’चा पुढाकार; ‘नूरा हेल्थ’सोबत सामंजस्य करार
By सुमेध वाघमार | Published: April 29, 2023 07:09 PM2023-04-29T19:09:46+5:302023-04-29T19:10:10+5:30
Nagpur News ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था’ने (एम्स) माता व बालमृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने, ‘केअर कंपेनियन प्रोग्राम (सीसीपी) सुरू केला आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : ‘अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था’ने (एम्स) माता व बालमृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने, ‘केअर कंपेनियन प्रोग्राम (सीसीपी) सुरू केला आहे. यासाठी ‘एम्स’ने ‘नूरा हेल्थ’सोबत सामंजस्य करार केला आहे. या करारावर तत्कालिन एम्सच्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी स्वाक्षरी केली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार, नूरा हेल्थकडून डॉ. निलेश गावंडे, डॉ. दीपाली ठाकूर, डॉ. तन्मय पठाणी आणि डॉ. नीलेश उपस्थित होते.
‘एम्स’मध्ये दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत आहे. यात विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगाणा येथून येणाºया रुग्णांची भर पडत आहे. उपचार करण्यासोबतच आजाराविषयक जनजागृतीसाठी ‘एम्स’ने पुढाकार घेतला आहे. यात ‘केअर कंपेनियन प्रोग्राम’ महत्त्वाचा ठरणार आहे. यात गर्भवती महिलांना बाळाला स्तनपान कसे करावे, कावीळ या सांरख्या बालकांच्या आजाराची लक्षणे कशी ओळखावी, गर्भधारणेदरम्यान आणि नंतर आईचा आहार कसा असावा, स्वच्छता कशी राखावी, कुटुंब नियोजन आदींची माहिती व प्रात्याक्षिक ‘नूरा हेल्थ’ कडूनदिले जाणार आहे.
-वडिलांनाही दिले जाईल बाळाला पकडण्याचे प्रशिक्षण
या कार्यक्रमांतर्गत वडिलांनी आपल्या नवजात बाळाला कसे पकडावे, वरून दूध देण्याची वेळ आली तर ते कसे पाजावे, बाळांचे लसीकरण, लसीचे महत्त्व, बाळाची आंघोळ कशी घालावी आदींचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.
-तीन टप्प्यात राबविला जाणार कार्यक्रम
े‘एम्स’चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीगिरीवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले, नूरा हेल्थचे डॉ. नीलेश गावंडे या कार्यक्रमाचे संचालन व नेतृत्व करतील. हा कार्यक्रम तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. पहिला टप्प्यात माता व बाल आरोग्य, दुसºया टप्प्यात जनरल मेडिसीन व सर्जरी तर तिसºया टप्प्यात कार्डिओलॉजी व नेफ्रोलॉजीशी संबंधित रुग्ण असणार आहेत. हा कार्यक्रम तीन वर्षांपासून यवतमाळ मेडिकलमध्ये राबविला जात आहे. या कार्यक्रमामुळे माता व बालमृत्यू कमी करण्यात यश येईल, असेही ते म्हणाले.