Air Fest 2022 : नागपूरच्या आकाशात वायुदलाच्या चित्तथरारक कसरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2022 02:09 PM2022-11-19T14:09:30+5:302022-11-19T14:23:25+5:30
डोळ्याचं पारणं फेडणारा नागपूरचा थरारक 'एयर फेस्ट'; स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजन
सुरभी शिरपूरकर
नागपूर :नागपूरच्या आकाशात वायुदलाच्या चित्त थरारक कसरती नागपूरकरांना अनुभवायला मिळाल्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शोमध्ये सूर्यकिरण एरोबॅटीक आणि सारंग हेलिकॉप्टरच्या नमुने केलेल्या हवाई कसरतीने नागपूरकरांच्या डोळ्यांचे जणू पारणेच फेडले. तीन दिवस एयर फेसचा सराव आणि अखेर तो दिवस आला, ज्याची वाट नागपूरकरांना होती
वायुसेना नगरातील मेंटेनन्स कमांडच्या परेड मैदानावर निमंत्रितांना हवाई थरार अनुभवायला मिळाला. यामध्ये सूर्यकिरण एरोबॅटीक टीम सारंग हेलिकॉप्टर ऍग्रो आकाशगंगा एअर वॉरियस ड्रिल टीम एनसीसी ग्लाइडर्स आदींचा समावेश होता. आकाशगंगा या पथकाच्या दहा योद्धांनी ८ हजार फूट उंचावर या चित्त थरारक आणि श्वास रोखून धरणाऱ्या हवाई कसरती आणि प्रत्यक्ष त्याचे सादरीकरण केले. यामध्ये सूर्य किरण एरोबॅटिक टीम, सारंग हेलिकॉप्टर एअर डिस्प्ले टीम, आकाशगंगा टीम आणि एअर वॉरियर ड्रिल टीम यांचा समावेश होता.
इतर उपक्रमांमध्ये पॅरा हँड ग्लाइडिंग, वाहतूक आणि लढाऊ विमानांद्वारे फ्लायपास्ट, आयएएफ उपकरणांचे प्रदर्शन, एरो-मॉडेलिंग आणि एअर फोर्स बँड सादरीकरण पाहायला मिळाले.
आकाशगंगा टिमने तिरंगा ध्वज उंच नेला. आणि शेवटी संघातील तीन सदस्य तिरंगा घेऊन उतरले. हा उपस्थितांसाठी अभिमानाचा क्षण होता. डॉर्नियर विमानातून आठ हजार फूट उंचीवर स्कायडायव्हिंग करण्यात आले. या चित्तथरारक प्रात्यक्षिकाने नागपूरकर थक्क झाले. अॅवेरो हे मध्यम आकाराचे वाहतूक विमान जमिनीपासून ५०० फूट उंचीवर उडत होते.
‘संपूर्ण जगात चार ते पाच देशांमध्ये सूर्यकिरणसारख्या एरोबॅटिक डिस्प्ले टीम आहेत. त्यातील सूर्यकिरण ही सर्वोत्तम अशा स्वरूपाची असून ती देशाचा सन्मान वाढवित आहे’, अशी माहिती सूर्यकिरणच्या चमूतील फ्लाइट लेफ्टनंट आणि टीम कॉमेंटेटर रिद्धिमा गुरुंग यांनी दिली.
एअरोमॉडेलिंग शो, वायुसेनेच्या बॅण्डचे सादरीकरण विशेष आकर्षण होते. यंदाच्या शोमध्ये सुखोईचा समावेश नव्हता. त्यामुळे भारतीय वायुसेनेचा कणा असलेल्या अत्याधुनिक अशा या लढाऊ विमानाच्या हवाई कसरतींना नागपूरकर मुकले. मात्र, चित्त थरारक आणि श्वास रोखून धरणाऱ्या कसरतींची परभणी नागपूरकरांना नक्कीच मिळाले यात काही शंका नाही.