वायुसेनेच्या अत्याधुनिक विमान, हेलिकॉप्टर व शस्त्रांनी वेधले लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 09:58 PM2018-09-29T21:58:08+5:302018-09-29T22:00:36+5:30
सर्जिकल स्ट्राईकच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय वायुसेनेतर्फे एअर फोर्स स्टेशन सोनेगाव येथे शुक्रवार व शनिवार या दोन दिवसीय ‘स्टॅटिक डिस्प्ले’चे आयोजन करण्यात आले होते. भारतीय वायुसेनेतर्फे हा दिवस विशेष पराक्रम म्हणून पाळला जात आहे. दोन्ही दिवशी वायुसनेचे अत्याधुनिक विमान, हेलिकॉप्टरसह विविध शस्त्रांच्या प्रदर्शनाने विशेष लक्ष वेधले. या प्रदर्शनाला तब्बल पाच हजारावर नागरिकांनी भेट देऊन लाभ घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्जिकल स्ट्राईकच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय वायुसेनेतर्फे एअर फोर्स स्टेशन सोनेगाव येथे शुक्रवार व शनिवार या दोन दिवसीय ‘स्टॅटिक डिस्प्ले’चे आयोजन करण्यात आले होते. भारतीय वायुसेनेतर्फे हा दिवस विशेष पराक्रम म्हणून पाळला जात आहे. दोन्ही दिवशी वायुसनेचे अत्याधुनिक विमान, हेलिकॉप्टरसह विविध शस्त्रांच्या प्रदर्शनाने विशेष लक्ष वेधले. या प्रदर्शनाला तब्बल पाच हजारावर नागरिकांनी भेट देऊन लाभ घेतला.
शुक्रवारी या प्रदर्शनाला सुरुवात झाली. शनिवारी समारोप झाला. या दोन्ही दिवशी पाच हजारावर लोकांनी भेट दिली. यात २५०० विद्यार्थ्यांचा समावेश होता हे विशेष. यावेळी वायुसेना सोनेगाव स्टेशनच्या तरुण अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांना सैन्य अधिकाऱ्यांच्या कठीण जीवनाबद्दल सांगितले. या ठिकाणी बनवण्यात आलेल्या ‘सेल्फी वॉल’ने विद्यार्थ्यांना विशेष आकर्षित केले. सैन्याच्या जवानांसाठी संदेश लिहिणाऱ्यांमध्येही विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. यावेळी वायुसेनेबद्दल विशेष माहिती देण्यात आली. वायुसेनेची क्षमता, जगात इतर देशांच्या तुलनेत भारताची वायुसेना किती शक्तिशाली आहे, याची परिपूर्ण माहितीही विद्यार्थी व नागरिकांना देण्यात आली. या मार्गदर्शनासोबतच विद्यार्थी व नागरिकांनी प्रदर्शनातून स्वत:ही वायुसेनेच्या क्षमतेचा परिचय करून घेतला.