एअर इंडियाने एआयडीएसएलच्या नावाने केला नागपूर एमआरओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:07 AM2021-06-01T04:07:45+5:302021-06-01T04:07:45+5:30

वसीम कुरेशी नागपूर : देशातील सहाव्या एमआरओने सुरुवातीला सब्सिडरी कंपनी एयर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (एआयईएसएल) च्या नावे केले ...

Air India launches Nagpur MRO in the name of AIDSL | एअर इंडियाने एआयडीएसएलच्या नावाने केला नागपूर एमआरओ

एअर इंडियाने एआयडीएसएलच्या नावाने केला नागपूर एमआरओ

Next

वसीम कुरेशी

नागपूर : देशातील सहाव्या एमआरओने सुरुवातीला सब्सिडरी कंपनी एयर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (एआयईएसएल) च्या नावे केले आहे. त्यानंतर त्रिवेंद्रम, हैदराबाद, मुंबई, दिल्ली आणि कोलकाता एमआरओसुद्धा एआयईएसएलला हस्तांतरित करण्यात येतील. एअर इंडियाची सेवा खासगीकणाची तयारी करीत असताना असताना एआयईएसएलचे खासगीकरण होऊ शकत नाही.

उल्लेखनीय म्हणजे ७ वर्षांपूर्वी एअर इंडियाने बोइंगपासून ६८ विमान खरेदी केले होते. त्याऐवजी बोइंग एक रक्कम (सेट बँक अमाउंट) रोखऐवजी एमआरओच्या निर्माण करण्यासाठी दिली. मिहान परिसरात ५० एकर जमिनीवर बोइंगने सियाटल, यूएसएच्या आपल्या एमआरओच्या धतीवर नागपुरात एमआरओ तयार केले. काही वेळ एअर इंडियाच्या बोइंग टीमने येथे सोबत काम केले; परंतु त्यानंतर २०१४ मध्ये कामकाज सुपुर्द केले. त्यानंतर आतापर्यंत एअर इंडियाच्या सब्सिडरी कंपनी एआयईएसएल पॅरेंट कंपनीला आता अचल संपत्तीचे वार्षिक भाडे देत होती; परंतु आता या संपत्तीचा हक्क मिळाल्यामुळे त्यांना भाडे भरण्यापासून सुटका मिळाली आहे.

.............

नव्या भरतीत नवे नियम

एआरईएसएलच्या सूत्रांनी सांगितले की, कंपनीत एअर इंडियात पूर्वी पाठविलेल्या कर्मचाऱ्यांसाठी नियम अटी पूर्ववत राहतील; परंतु आता नव्या भरतीसोबत नियम राहणार नाहीत. एआयईएसएलचे नियम, अट पूर्ववत राहतील; परंतु आतापर्यंत नव्या भरतीसोबत नवे नियम राहतील. एअर इंडियाच्या बिकट स्थितीमुळे एआयईएसएलला खराब परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. नागपूर एमआरओमध्ये विमानांची दुरुस्ती करण्यासाठी वर्षभर प्रयत्न करण्यात आले; परंतु एमआरओत स्पेअर पार्ट बदलून विमान दुरुस्त करण्यात आले.

................

Web Title: Air India launches Nagpur MRO in the name of AIDSL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.