एअर इंडियाचे दिल्लीचे विमान हैदराबादमार्गे उडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 08:21 PM2020-07-06T20:21:18+5:302020-07-06T20:24:58+5:30

एअर इंडियाचे नागपूर-दिल्ली विमान सोमवारी सकाळी हैदराबादमार्गे रवाना झाले. एआय ५६० हे विमान नागपूरवरून सकाळी ९.३० वाजता रवाना झाले. ते दिल्लीवरून सकाळी ७ वाजता नागपूरला पोहोचले होते.

Air India's flight to Delhi flew via Hyderabad | एअर इंडियाचे दिल्लीचे विमान हैदराबादमार्गे उडाले

एअर इंडियाचे दिल्लीचे विमान हैदराबादमार्गे उडाले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एअर इंडियाचे नागपूर-दिल्ली विमान सोमवारी सकाळी हैदराबादमार्गे रवाना झाले. एआय ५६० हे विमान नागपूरवरून सकाळी ९.३० वाजता रवाना झाले. ते दिल्लीवरून सकाळी ७ वाजता नागपूरला पोहोचले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाची नागपूर-दिल्ली-नागपूर विमान सेवा आठवड्यातून तीन दिवस सोमवार, गुरुवार आणि शनिवार अशी आहे. याचे फ्लाईट नंबर एआय ४६९/४७० असा असतो. परंतु सोमवारी दिल्ली ते नागपूर दरम्यान विमानाचा नंबर एआय ५६० होता. विमानतळावरील सूत्रांनुसार, हे विमान हैदराबाद ते दिल्ली दरम्यान चालते. सोमवारी हे विमान नागपूरला पोहोचले तेव्हा यात नागपूर ते हैदराबादसाठी एकही प्रवासी नव्हता. असे सांगितले जाते की, कोविड-१९ मुळे एअर इंडियाला चालक दलाच्या समस्या भेडसावत आहे. यामुळे विमानांमध्ये असे बदल करावे लागत आहे. यासंबंधात विचारले असता विमानतळाकडृून नेहमीप्रमाणे ऑपरेशनल कारण सांगण्यात आले.

Web Title: Air India's flight to Delhi flew via Hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.