एअर इंडियाच्या नागपूर कार्यलयाची बोली लागलीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:07 AM2021-07-15T04:07:10+5:302021-07-15T04:07:10+5:30
- एअर इंडियाकडून बीएसएनएलच्या सिव्हील लाईन्स येथील कार्यालय परिसरात समोरील जागा मिळविण्याचा प्रयत्न. - हा भूखंड १९८४ मध्ये ...
- एअर इंडियाकडून बीएसएनएलच्या सिव्हील लाईन्स येथील कार्यालय परिसरात समोरील जागा मिळविण्याचा प्रयत्न.
- हा भूखंड १९८४ मध्ये एअर इंडियाला जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला होता. १९८७ मध्ये जागेचा करार होऊन १९९२ मध्ये इमारत पूर्ण झाली. त्यानंतर येथे बुकिंग कार्यालय कार्यन्वित झाले.
- त्या काळात एअर इंडियाला प्रतिस्पर्धी नव्हते. नंतरच्या काळात अन्य एअरलाईन्स ऑपरेशन्स सुरू झाल्या. व्यवसायावर प्रभाव पडला. कर्मचारीही शंभरावरून २० वर आले.
......
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरकारी कंपनी असलेल्या एअर इंडियाची देशभरातील १० शहरांमध्ये असलेली संपत्ती विकली जाणार आहे. यासाठी ८ व ९ जुलैला लावण्यात आलेल्या बोलीमध्ये एअरलाईन्सच्या नागपुरातील सिव्हील लाईन्स येथील बुकिंग कार्यालयाची बोली लावण्यात आलीच नाही. यासाठी ३७ कोटी रुपये आधारमूल्य (रिझर्व्ह प्राईज) ठेवण्यात आली होती. आता पुढील तीन महिन्यानंतर पुन्हा बोली लावली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. सुमारे २७ हजार चौरस फुटाच्या भूखंडासह यावरील इमारतीच्या खरेदीसाठी काही कंपन्यांनी स्वारस्य दाखविले होते. प्रत्यक्षात बोली लावताना कोणीच पुढे आले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादमधील एअर इंडियाच्या संपत्तीची आधारमूल्यापेक्षाही अधिक बोली लागली.
...
बीएसएनएलकडे समोरील जागेची मागणी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर बुकिंग कार्यालय लवकर विकले जाण्याची शक्यता लक्षात घेता एअरलाईन्सच्या प्रतिनिधींनी बीएसएनएलकडे समोरील जागेची मागणी केली होती. मात्र त्यांनी मागील जागा देण्याची तयारी दाखविली, अशी माहिती आहे.