विदेशात उड्डाणासाठी एअर इंडियाचा प्रस्ताव
By admin | Published: July 13, 2016 03:33 AM2016-07-13T03:33:11+5:302016-07-13T03:33:11+5:30
नागपुरातून बँकॉक आणि दुबईला जाणारे विमान पुन्हा सुरू करण्यासाठी एअर इंडियाच्या नागपूर
नागपूर : नागपुरातून बँकॉक आणि दुबईला जाणारे विमान पुन्हा सुरू करण्यासाठी एअर इंडियाच्या नागपूर कार्यालयाने दिल्लीतील मुख्यालयाकडे प्रस्ताव पाठविल्याची अधिकृत माहिती आहे. दहा वर्षांपूर्वी नागपुरातून या दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा होती, हे विशेष.
नागपूरचा वेगाने विकास
सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कतार एअरवेजची दोहा आणि एअर अरेबियाची शारजाह सेवा नियमित सुरू आहे. बँकॉक आणि दुबईसाठी पुरेसे प्रवासी मिळण्याची कंपनीला अपेक्षा आहे. सध्या नागपुरातून विदेशात जाणाऱ्या दोन्ही विमान कंपन्यांना उत्तम प्रतिसाद मिळत असल्यामुळेच एअर इंडियाच्या नागपूर कार्यालयाने प्रस्ताव पाठविला आहे. नागपूर देशात पाचव्या क्रमांकाचे वेगाने विकसित होणारे शहर आहे. उपराजधानीत मेट्रो रेल्वे, मिहान प्रकल्प, शहराचा वेगाने होणारा विकास आणि विदेशी व स्थानिक पर्यटकांची संख्या वाढली आहे. विमानाची दुरुस्ती आणि देखभालीसाठी नागपुरात एअर इंडियाचा एमआरओ सुरळीत सुरू आहे. (प्रतिनिधी)