कॅन्सरग्रस्त चिमुकल्याला हवाय आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:37 AM2021-02-05T04:37:20+5:302021-02-05T04:37:20+5:30

गोंडखैरी : कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी येथील कन्सरग्रस्त तीनवर्षीय गुन्मय मनोज घवघवे याला काही दिवसांपूर्वी गंभीर आजार झाला. रक्त चाचणीत ...

Air support for cancerous sparkles | कॅन्सरग्रस्त चिमुकल्याला हवाय आधार

कॅन्सरग्रस्त चिमुकल्याला हवाय आधार

Next

गोंडखैरी : कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी येथील कन्सरग्रस्त तीनवर्षीय गुन्मय मनोज घवघवे याला काही दिवसांपूर्वी गंभीर आजार झाला. रक्त चाचणीत ब्लड कॅन्सरचे निदान झाले. मात्र घवघवे कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मुलावर उपचार करण्यासाठी आई-वडिलांनी मदतीची हाक दिली आहे. १८ डिसेंबर २०१७ पासून गुन्मयवर मुंबई येथील वाडिया चिल्ड्रन रुग्णालयात औषधोपचार सुरू होता. मात्र मध्यंतरी गुन्मयची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी नागपूर येथील नॅशनल कॅन्सर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने पुन्हा मुंबई येथील वाडिया चिल्ड्रन रुग्णालयात पुढील उपचाराकरिता त्याला दाखल करण्यात आले. गुन्मयवरील उपचारासाठी २५ लाख रुपयांचा खर्च असल्याची माहिती आई-वडिलांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. त्यांच्याजवळ असलेले पैसे आतापर्यंतच्या उपचारावर खर्च झाले. आता मात्र पैसे नसल्याने आई-वडिलांनी मदतीची हाक दिली आहे. गुन्मयला उपचारासाठी मदत करण्यासाठी दानदात्यांना ८८०५८१२११४७ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

Web Title: Air support for cancerous sparkles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.