एअरबॅग्जमुळे बचावला अभिनेता सोनू सूदच्या पत्नी आणि मेहुणीचा जीव

By योगेश पांडे | Updated: March 25, 2025 16:22 IST2025-03-25T16:21:13+5:302025-03-25T16:22:18+5:30

नागपूरला येत असतांना झाला अपघात : सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

Airbags save the lives of actor Sonu Sood's wife and sister-in-law | एअरबॅग्जमुळे बचावला अभिनेता सोनू सूदच्या पत्नी आणि मेहुणीचा जीव

Airbags save the lives of actor Sonu Sood's wife and sister-in-law

योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
अभिनेता सोनू सूद यांच्या पत्नी व मेहुणीचा नागपुरात अपघात झाला. वर्धा मार्गावरील डबल डेकर उड्डाणपुलावर एका ट्रकशी कार धडकली. यात कारचा चेंदामेंदा झाला असून सूद यांच्या पत्नी सोनाली व मेहुणीवर एका इस्पितळात उपचार सुरू आहेत. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

सोनू सूद यांची पत्नी, मेहुणी व आणखी एक नातेवाईक बाहेरगावाहून सोमवारी रात्री नागपुरला येत होते. उड्डाणपुलावर एका ट्रकला गाडी मागून धडकली व त्यामुळे मोठा अपघात झाला. कारचे बोनेट पुर्णत: चेंदामेंदा झाले. सोनाली समोरील सीटवर बसल्या होत्या व त्या जखमी झाल्या. कारच्या एअरबॅग्ज उघडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. सोनाली सूद यांना तातडीने एका इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

Web Title: Airbags save the lives of actor Sonu Sood's wife and sister-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.