नागपूरच्या आकाशात विमान अपघात थोडक्यात टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:35 AM2018-03-21T00:35:29+5:302018-03-21T00:35:41+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी इंडिगो एयरलाईन्सच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला. पायलटला वेगवान वाऱ्यामुळे टच डाऊन झोनचा योग्य अंदाज बांधता आला नाही. त्यामुळे विमानाने धावपट्टीवर उतरताना पुन्हा उड्डाण भरली. त्यानंतर आकाशात काहीवेळ घिरक्या घातल्यानंतर ते सुखरुप धावपट्टीवर उतरले. या घटनेमुळे सुदैवाने कोणतीही हाणी झाली नाही.

The aircraft crash avoided in Nagpur | नागपूरच्या आकाशात विमान अपघात थोडक्यात टळला

नागपूरच्या आकाशात विमान अपघात थोडक्यात टळला

googlenewsNext
ठळक मुद्देकोणतीही हाणी नाही : धावपट्टीवर उतरताना पुन्हा भरली उड्डाण

वशीम कुरैशी

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी इंडिगो एयरलाईन्सच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला. पायलटला वेगवान वाऱ्यामुळे टच डाऊन झोनचा योग्य अंदाज बांधता आला नाही. त्यामुळे विमानाने धावपट्टीवर उतरताना पुन्हा उड्डाण भरली. त्यानंतर आकाशात काहीवेळ घिरक्या घातल्यानंतर ते सुखरुप धावपट्टीवर उतरले. या घटनेमुळे सुदैवाने कोणतीही हाणी झाली नाही.
टच डाऊन झोन (लॅन्डिंग पॉईन्ट)चा योग्य अंदाज घेण्यात चुक झाल्यामुळे विमानाचे अपघात अनेकदा घडले आहेत. इंडिगो एयरलाईन्सच्या ६ ई ७१०२ विमानाचा अपघात पायलटच्या सतर्कतेमुळे टळला. ७२ आसनक्षमतेचे हे विमान हैदराबाद येथून निर्धारित वेळ सायंकाळी ६.२० वाजतापेक्षा आधी, म्हणजे सायंकाळी ५.३० वाजता नागपुरात पोहोचले. त्यावेळी वारे वेगात होते. परिणामी पायलटला टच डाऊन झोनचा योग्य अंदाज बांधता आला नाही व विमान खाली उतरताना निर्धारित जागेपासून पुढे निघून गेले. त्यामुळे पायलटने पुन्हा विमानाची उड्डाण भरली. हे विमान काहीवेळ अगदी जवळून आकाशात फिरत होते. परिसरातील नागरिक विमानाकडे कौतुकाने पहात होते.
मिहान इंडिया कंपनीचे वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर यांनी याविषयीची तांत्रिक माहिती दिली. विमान टच डाऊन पॉईन्टपासून १००० मीटर अंतरापर्यंत धावपट्टीवर उतरविता येते. वेगवान वारे किंवा अन्य कारणांनी असे करण्यात अपयश आल्यास विमानाची उड्डाण भरून त्याला परत धावपट्टीवर उतरवावे लागते असे मुळेकर यांनी सांगितले.
हा पहिला प्रसंग नाही
शहरामध्ये अगदी जवळून विमान उडण्याचा हा पहिला प्रसंग नाही. यापूर्वी ट्रेनिंग व टेस्टींग विमाने जवळून उडताना पहायला मिळाली होती. एयर इंडिया एमआरओ व अन्य कारणांनी नागपुरात ट्रेनिंग व टेस्टींग विमानांची उड्डाणे वाढली आहेत.
एयर एशियाच्या विमानाला विलंब
एयर एशियाचे नागपूर-बेंगळुरू विमान मंगळवारी दुपारी १ वाजता ऐवजी दुपारी १.४५ वाजता रवाना झाले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगळुरू विमानतळावरील कंजेशनमुळे या विमानाला विलंब झाला.

Web Title: The aircraft crash avoided in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.