अजब प्रेम की खतम कहानी!

By admin | Published: June 4, 2016 02:48 AM2016-06-04T02:48:59+5:302016-06-04T02:48:59+5:30

कानपुरातील (उत्तरप्रदेश) निशा अन् सरवर या भिन्न धर्मिय तरुण तरुणीचे प्रेम प्रकरण वेगळ्या धाटणीचे आहे.

Ajab Prem ki Khamat kahani! | अजब प्रेम की खतम कहानी!

अजब प्रेम की खतम कहानी!

Next

जीवाच्या धाकाने गाव सोडले : जीव दिला, जीव घेतला
नरेश डोंगरे  नागपूर
कानपुरातील (उत्तरप्रदेश) निशा अन् सरवर या भिन्न धर्मिय तरुण तरुणीचे प्रेम प्रकरण वेगळ्या धाटणीचे आहे. पाच वर्षांपूर्वी त्याची कुणकुण दोघांच्याही घरच्यांना लागली होती. अर्थात्च तीव्र विरोध, भांडणे आणि दोन गटात हाणामारी देखील झाली. दोघांनाही घरच्यांकडून ‘काट डालेंगे’अशी धमकी मिळाली. मात्र, पे्रमवीर कुठे धमक्यांना भीक घालतात? निशा अन् सरवरही कुणाला भीत नव्हते. दोघांच्या घरच्यांकडून त्यांच्या हालचालीवर डोळा असतानाही त्यांच्यातील दुरावा कमी झाला नाही. सारखे दडपण, मारहाण, धमक्या मिळत असल्याने त्यांनी अखेर तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. दोन्हीकडून तीव्र विरोध झाल्याने जीवाच्या भीतीने आणि एकत्र राहण्याच्या उत्कटतेने निशा आणि सरवर यांनी २०१३ मध्ये कानपुरातून पळ काढला. काही दिवस इकडच्या तिकडच्या नातेवाईकांकडे राहिले.
घरची मंडळी रागाने बेभान झाली होती. मिळेल तेथे कापून काढू, अशी भाषा कानावर पडत असल्याने जीवाच्या धाकाने हे दोघे तीन वर्षांपूर्वी नागपुरात आले. मोमीनपुऱ्यातील टिमकी भागात त्यांनी एका इमारतीत भाड्याच्या खोलीत संसार थाटला.
कपड्यांवर कलाकुसर करणारा सरवर सनकी तर, मनिषा तापट अन् एकलकोंड्या स्वभावाची होती. ती अलीकडे पतीशी थोड्याथोड्या कारणावरून वाद घालायची. त्यामुळे या दोघांमध्ये नेहमी खटके उडायचे. मात्र, ते शेजाऱ्यांकडे आपले कधीच गाऱ्हाणे मांडत नव्हते. कुणाशी फारसे बोलतही नव्हते. ते आणि त्यांच्यासोबतचा चिमुकला दादू एवढेच त्यांचे नागपुरातील विश्व! त्यामुळे शेजारची मंडळीही त्यांच्याकडे फारसे लक्ष देत नव्हती.
ते दोघे भिन्न धर्मिय असावे, अशी खात्री एकूणच वर्तनातून बाजूच्यांना पटली होती. त्यांचे प्रेमप्रकरण असावे आणि जीवाच्या धाकाने ते बाहेरगावाहून पळून आले असावे, असाही तर्क शेजाऱ्यांनी काढला होता. तो खराही होता. (प्रतिनिधी)

रजिस्टरवर उतरवल्या वेदना
निशा आणि सरवरने जातीधर्माच्या बेड्या तोडल्या होत्या. कुटुंबीयांचीही बंधने झुगारली होती. नागपुरात असे एकाकी जीवन जगण्यासाठी ते घरच्यांना दोष द्यायचे. त्यांच्याकडून होणारा त्रास किती क्लेषदायक आहे, ते एका रजिस्टरवर लिहायचे. घरच्यांमुळे आपले जगणे किती कठीण झाले, त्या वेदना हे दोघे शब्दबद्ध करीत होते. त्यांनी गेल्या तीन वर्षात आपल्या कुटुंबीयांकडून होणाऱ्या त्रासाची माहिती रजिस्टरच्या तब्बल ४० पानांवर उतरवली होती.
नाहकच गेला दादूचा बळी
या प्रकरणातील एक धक्कादायक बाब म्हणजे, दादू हा निशा आणि सरवरचा मुलगा नव्हे. तो निशाची कानपुरात राहणारी बहीण अनिताचा मुलगा आहे. निशाचा दादूवर खूप जीव होता. त्यामुळे घरून पळून येताना तिने दादूलाही सोबत आणले होते. प्रेमासाठी कडाडून होणारा विरोध सहन करणाऱ्या दोघांनी आपले घर, गाव, नातेवाईक सोडले. आता जगणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने जीवही सोडला. मात्र, निरागस दादूचा त्यांनी नाहक जीव घेतला. त्याचा कसलाही दोष नसताना तो या ‘अजब प्रेम की खतम कहानी‘चा बळी ठरला.

Web Title: Ajab Prem ki Khamat kahani!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.