अजनी व नागपूर स्टेशन बनले रेल्वेचे प्रमुख पार्सल लोडिंग पॉईंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2023 08:47 PM2023-05-25T20:47:55+5:302023-05-25T20:48:19+5:30

Nagpur News राज्यातील अजनी, नागपूर, भिवंडी आणि जळगावला प्रमुख पार्सल लोडिंग पॉईंट (हब)च्या रुपात विकसित करण्याचे ठरविण्यात आले आहे.

Ajani and Nagpur stations became major parcel loading points for the railways | अजनी व नागपूर स्टेशन बनले रेल्वेचे प्रमुख पार्सल लोडिंग पॉईंट

अजनी व नागपूर स्टेशन बनले रेल्वेचे प्रमुख पार्सल लोडिंग पॉईंट

googlenewsNext

नागपूर : राज्यातील अजनी, नागपूर, भिवंडी आणि जळगावला प्रमुख पार्सल लोडिंग पॉईंट (हब)च्या रुपात विकसित करण्याचे ठरविण्यात आले आहे. मध्य रेल्वेच्या मुंबईतील मुख्यालयात विविध विभागांच्या वरिष्ठांचे वार्षिक संमेलन बुधवारी पार पडले. महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी या संमेलनाला संबोधित केले. यावेळी अप्पर महाव्यवस्थापक आलोक सिंह आणि प्रधान व्यवस्थापक (परिचालन) प्रामुख्याने उपस्थित होते. संमेलनात नागपूर, मुंबई, भुसावळ, पुणे, आणि सोलापूर विभागाच्या परिचालन विभाग प्रमुखांनी हजेरी लावली. त्यात झालेल्या चर्चेनुसार उपरोक्त निर्णय जाहिर करण्यात आला. चालू आर्थिक वर्षांतील उपलब्धी आणि उद्दिष्ट यावर या संमेलनात मंथन झाले.


पार्सल लोडिंग हब

राज्यातील अजनी, नागपूर, भिवंडी आणि जळगावंला प्रमूख पार्सल लोडिंग पॉईंट (हब)च्या रुपात विकसित करण्याचे यावेळी जाहिर करण्यात आले. विशेष म्हणजे, उपरोक्त ठिकाणांवरून मध्य रेल्वेने २०२२-२३ मध्ये ३१२ पार्सल ट्रेनमध्ये ७,७६, ७५९ टन पार्सलचे लोडिंग करण्यात आले. त्यातून ४५ कोटी, ८६लाखांचे उत्पन्न मध्य रेल्वेला झाले.
 

९०.०५ मिलियन टनाचे उद्दिष्ट
२०२१-२२ मध्ये रेल्वे द्वारा ७६.१६ मिलियन टन माल लादून त्याची वाहतूक करण्यात आली होती. तर, २०२२-२३ मध्ये हा आकडा ८१.८८ मिलियन टन एवढा होता. सुरू असलेल्या वर्षांत (२०२३-२४) ९०.०५ मिलियन टनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यात सिमेंट आणि कोळशाच्या लोडिंगचा भार जास्त आहे.

कोळसा चमकला
गेल्या काही वर्षांत पार्सल लोडिंगमध्ये कोळशाची कामगिरी सर्वोत्तम राहिली. गेल्या वर्षी ७.८८ मिलियन टन सिमेंटचे तर ३७.१७ मिलियन टन कोळशाचे लोडिंग रेल्वेने केले. तत्पूर्वी २०२१ -२२ मध्ये हा आकडा ३९.५२ मिलियन टन एवढा होता. २०२३-२४ मध्ये ८.८ मिलियन टन सिमेंट तर, कोळसा पार्सल लोडिंगचे उद्दिष्ट ४०.९५ मिलियन टन ठेवण्यात आले आहे.

Web Title: Ajani and Nagpur stations became major parcel loading points for the railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.