अजनी-अमरावती इंटरसिटीला चांदूर येथे थांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 07:54 PM2018-02-23T19:54:10+5:302018-02-23T19:54:26+5:30
रेल्वे प्रशासनाने अजनी-अमरावती-अजनी इंटरसिटी आणि अमरावती-जबलपूर-अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेसला २६ फेब्रुवारीपासून चांदूर रेल्वेस्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे प्रशासनाने अजनी-अमरावती-अजनी इंटरसिटी आणि अमरावती-जबलपूर-अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेसला २६ फेब्रुवारीपासून चांदूर रेल्वेस्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक १२१५९ अमरावती-जबलपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस अमरावतीवरून सायंकाळी ५.४५ वाजता सुटून चांदूरला सायंकाळी ६.३३ येऊन ६.३४ वाजता सुटेल, धामणगावला ही गाडी सायंकाळी ६.५० वाजता येऊन ६.५२ वाजता सुटेल. १२१६० जबलपूर-अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेस धामणगावला सकाळी ८.२३ वाजता येऊन ८.२५ वाजता सुटेल. चांदूरला ही गाडी ८.३७ वाजता येऊन ८.३८ वाजता सुटेल, अमरावतीला ही गाडी सकाळी ९.५० वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक १२११९ अमरावती-अजनी सुपरफास्ट एक्स्प्रेस अमरावतीवरून पहाटे ५.३० वाजता सुटेल. ही गाडी चांदूरला सकाळी ६.०६ वाजता येऊन ६.०७ वाजता सुटेल. धामणगावला ही गाडी सकाळी ६.१९ वाजता येऊन ६.२१ वाजता सुटेल. १२१२० अजनी-अमरावती ही गाडी धामणगावला रात्री ८.१९ वाजता येऊन ८.२१ वाजता सुटेल. चांदूरला ही गाडी ८.३३ वाजता येऊन ८.३४ वाजता सुटेल. अमरावतीला ही गाडी रात्री ९.४० वाजता पोहोचेल. प्रवाशांनी चांदूर रेल्वेस्थानकावर ही गाडी थांबणार असल्याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.