अजनी-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2018 10:39 PM2018-11-09T22:39:10+5:302018-11-09T22:40:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्या नेहमीच फुल्ल राहतात. दिवाळीत ...

Ajni-Lokmanya Tilak Terminus Special Train | अजनी-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाडी

अजनी-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाडी

googlenewsNext
ठळक मुद्देप्रवाशांसाठी सुविधा : दिवाळीतील अतिरिक्त गर्दीसाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्या नेहमीच फुल्ल राहतात. दिवाळीत ही गर्दी आणखीनच वाढली आहे. त्यामुळे मुंबई मार्गावरील अतिरिक्त गर्दी पाहून रेल्वे प्रशासनाने अजनी-लोकमान्य टिळक टर्मिनस-अजनी विशेष रेल्वेगाडीच्या दोन फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०१२०२ अजनी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस १२ नोव्हेंबरला अजनीवरून सायंकाळी ७.५० वाजता सुटेल. ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसला १३ नोव्हेंबरला सकाळी ११.०५ वाजता पोहोचेल. रेल्वेगाडी क्रमांक ०१२०१ लोकमान्य टिळक टर्मिनस-अजनी एक्स्प्रेस १३ नोव्हेंबरला दुपारी १२.२५ वाजता सुटेल. ही गाडी अजनीला दुसऱ्या दिवशी रात्री ३ वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यांना वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, नासिक रोड, इगतपुरी आणि कल्याण येथे थांबा देण्यात आला आहे. दोन्ही गाड्यात १ एसी टु टायर, २ एसी थ्री टायर, ११ स्लिपरक्लास आणि ४ जनरल सेकंड क्लास कोच आहेत. प्रवाशांनी या विशेष रेल्वेगाडीचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Web Title: Ajni-Lokmanya Tilak Terminus Special Train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.