दिवाळीसाठी  अजनी-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 08:25 PM2018-11-01T20:25:01+5:302018-11-01T20:25:53+5:30

दिवाळीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी आणि वाढलेली प्रतीक्षा यादी पाहून रेल्वे प्रशासनाने ४ नोव्हेंबर २०१८ रोजी अजनी-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

Ajni-Lokmanya Tilak Terminus special train for Diwali | दिवाळीसाठी  अजनी-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाडी

दिवाळीसाठी  अजनी-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाडी

Next
ठळक मुद्दे प्रतीक्षायादी पाहून रेल्वे प्रशासनाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी आणि वाढलेली प्रतीक्षा यादी पाहून रेल्वे प्रशासनाने ४ नोव्हेंबर २०१८ रोजी अजनी-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने दिवाळीत प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे अजनीवरून लोकमान्य टिळक टर्मिनसला विशेष रेल्वेगाडीची एक फेरी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२०४० अजनी-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष रेल्वेगाडी ४ नोव्हेंबरला रात्री १०.४५ वाजता सुटेल. ही गाडी वर्धाला रात्री ११.४४, बडनेराला रात्री १.०५, अकोला २.०७, भुसावळला ४.१०, जळगावला ४.३७, मनमाडला सकाळी ६.३७, नाशिकला ७.४७, इगतपुरीला ९.०५, कल्याण १०.५७ आणि लोकमान्य टिळक टर्मिनसला १२.०५ वाजता पोहोचेल. या गाडीत एकूण २१ कोच आहेत. यात १ द्वितीय श्रेणी वातानुकुलित, १ तृतीय श्रेणी वातानुकुलित, १५ स्लिपर, २ साधारण द्वितीय श्रेणी आणि २ एसएलआर कोचचा समावेश आहे.

Web Title: Ajni-Lokmanya Tilak Terminus special train for Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.