अजनीची वृक्षताेड हायकाेर्टात, मेट्राेकडून ग्रीन बिल्डिंगची टिमकी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:07 AM2021-06-05T04:07:19+5:302021-06-05T04:07:19+5:30

महामेट्रोच्या अजनी मेट्रो स्टेशनला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलने (आयजीबीसी) आतापर्यंतचे सर्वात मोठे प्लॅटिनम रेटिंग दिल्याचे महामेट्राेने शुक्रवारी जाहीर केले. ...

Ajni's Vrikshatad High Court, Green Building Timki from Metra () | अजनीची वृक्षताेड हायकाेर्टात, मेट्राेकडून ग्रीन बिल्डिंगची टिमकी ()

अजनीची वृक्षताेड हायकाेर्टात, मेट्राेकडून ग्रीन बिल्डिंगची टिमकी ()

Next

महामेट्रोच्या अजनी मेट्रो स्टेशनला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलने (आयजीबीसी) आतापर्यंतचे सर्वात मोठे प्लॅटिनम रेटिंग दिल्याचे महामेट्राेने शुक्रवारी जाहीर केले. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाअंतर्गत सर्व कार्यरत स्थानकांपैकी आयजीबीसी प्रमाणपत्र प्राप्त झालेले अजनी हे १४ वे मेट्रो स्टेशन असल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र सर्व मेट्राे स्टेशन ग्रीन स्टेशन करण्याचे आधीच प्रस्तावित असताना पुन्हा त्याबाबत गवगवा करणे शहाणपणाचे वाटत नाही. तेही अजनी स्टेशनबाबत, जेव्हा की त्या परिसरात हाेणाऱ्या हजाराे झाडांना ताेडण्यावरून रान पेटले आहे. महामेट्राेच जे मार्ग सुरू झाले त्यावरून अद्यापही पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू झाली नाही व लाेकांना आकर्षित करण्यासाठी संघर्ष करावा लागताे आहे. अशावेळी त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि तेच महामेट्राेचे मुख्य कामही हाेय. काेराेनामुळे सध्या सर्व व्यवस्था ठप्प आहे. मात्र परिस्थिती सुधारल्यानंतर प्रवाशांना मेट्राेकडे आणणे आव्हान ठरणार आहे व ते पेलण्यासाठी नियाेजन महत्त्वाचे ठरणार आहे.

ग्रीन स्टेशनची व्याख्या काय, हे आधी आम्हाला समजावून सांगावे. साेलर पॅनल लावणे, रेन वाॅटर हार्वेस्टिंग म्हणजे ग्रीन स्टेशन असेल तर त्या स्टेशनच्या ५०० मीटरवर पहिल्या टप्प्यात ५००० व संपूर्ण टप्प्यात ४० हजार झाडे कापली जात असतील तर त्याला काय म्हणावे? केवळ आकर्षक डिझाईन करून ग्रीन हाेत नाही तर त्यासाठी असलेली ग्रीनरी जपावी लागते. स्टेशन जवळची झाडे शिल्लक राहिली तर स्टेशन आपाेआप ग्रीन वाटेल व ताेच शाश्वत विकास ठरेल.

- जाेसेफ जाॅर्ज, पर्यावरण कार्यकर्ते

Web Title: Ajni's Vrikshatad High Court, Green Building Timki from Metra ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.