अखिल विश्व महानुभाव परिषदेचे अध्यक्ष बिडकरबाबा यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2023 21:53 IST2023-01-07T21:53:24+5:302023-01-07T21:53:53+5:30
Nagpur News महानुभाव पंथातील प्रमुख आचार्य महंत श्री वर्धनस्थ बिडकरबाबा यांचे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते.

अखिल विश्व महानुभाव परिषदेचे अध्यक्ष बिडकरबाबा यांचे निधन
नागपूर : महानुभाव पंथातील प्रमुख आचार्य महंत श्री वर्धनस्थ बिडकरबाबा यांचे निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर जळगाव तालुक्यातील अमळनेर येथील रनाईच येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ते प्रवणाश्रम रनाईचे संचालक होते. बिडकरबाबा हे महानुभाव पंतातील १३ प्रमुख आचार्य परंपरेतील मुख्य महंत होते, तर अ.भा. महानुभाव परिषदेचे मार्गदर्शकही होते. बाबांच्या जाण्याने पंथ पोरका झाल्याची भावना महानुभावात व्यक्त होत आहे.