अकोला व अमरावती विमानतळ विकसित होणार; नितीन गडकरींकडून दिल्लीत आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 11:23 AM2022-06-29T11:23:48+5:302022-06-29T11:24:55+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी दिल्लीत या दोन्ही विमानतळाच्या कामासंदर्भात बैठक घेतली.
प्रवासी आणि माल वाहतूक करणाऱ्या विमानांची ये-जा करण्यासाठी आवश्यक अकोला व अमरावती येथील विमानतळावरील पायाभूत सुविधा विकसित करण्याचे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले.
अकोला व अमरावती येथे नियमितपणे विमानांची ये-जा होत नाही. नियमित वाहतुकीसाठी या दोन्ही विमानतळांची धावपट्टी मोठी करण्याची गरज असल्याचे गडकरी यांनी निदर्शनास आणून दिले. भविष्यातील गरज लक्षात घेत धावपट्टीसह कोणत्याही हवामानात विमाने उतरविण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, खासदार नवनीत राणा, आमदार वसंत खंडेलवाल व आमदार राजेंद्र पाटणी उपस्थित होते.