धोक्याची घंटा! नागपूर शहराला डेंग्यूचा डंख; प्रत्येक दहाव्या घरी आढळल्या अळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2021 07:00 AM2021-08-31T07:00:00+5:302021-08-31T07:00:12+5:30

Nagpur News कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला असताना नागपूरकरांना डेंग्यूचा डंख बसला आहे. शहरात पाचशेहून अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळल्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाला घरांच्या पाहणीदरम्यान हादराच बसला आहे.

Alarm bells! Dengue bite on Nagpur city; Larvae found in every tenth house | धोक्याची घंटा! नागपूर शहराला डेंग्यूचा डंख; प्रत्येक दहाव्या घरी आढळल्या अळ्या

धोक्याची घंटा! नागपूर शहराला डेंग्यूचा डंख; प्रत्येक दहाव्या घरी आढळल्या अळ्या

Next
ठळक मुद्दे​​​​​​​६१,२७३ घरात आढळल्या डेंग्यू अळ्या २५ दिवसांतील आकडेवारीमुळे प्रशासन हादरले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला असताना नागपूरकरांना डेंग्यूचा डंख बसला आहे. शहरात पाचशेहून अधिक डेंग्यूचे रुग्ण आढळल्यानंतर जाग आलेल्या प्रशासनाला घरांच्या पाहणीदरम्यान हादराच बसला आहे. ऑगस्ट महिन्यातील २५ दिवसांतच शहरातील ६० हजारांहून अधिक घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. शहरातील एकूण लोकसंख्या लक्षात घेतली तर सरासरी प्रत्येक दहाव्या घरी डेंग्यूच्या अळ्या आढळल्या असून, ही नागपूरकरांसाठी धोक्याची घंटा आहे. (Alarm bells! Dengue bite on Nagpur city)

डेंग्यूसंदर्भात १६ जुलैपासून सर्वेक्षण सुरू झाले. त्याअंतर्गत डेंग्यू संशयित किंवा बाधित रुग्णांच्या घरी भेट देणे, रुग्णांच्या नातेवाईकांचे रक्तनमुने घेणे व परिसरातील २०० घरांचे सर्वेक्षण सुरू झाले. १६ ते ३१ जुलै या कालावधीमध्ये मनपाच्या दहाही झोनमधील नोंदीनुसार ९८,००६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी १,०६४ तापाचे रुग्ण आढळले, तर ९२९ दूषित घरे आढळून आली. ३८,३४० कूलर्सची तपासणी केली असता ५,४०८ कूलर्समध्ये डासअळी आढळून आली. जुलैच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात नागपूर शहरात डेंग्यूचा धोका आणखी वाढला. १ ते २५ ऑगस्ट या दरम्यान ६०,३४४ घरात डेंग्यू अळ्या आढळून आल्या.

३४ टक्के घरे डेंग्यूच्या जाळ्यात

१ ते २५ ऑगस्टदरम्यान १ लाख ७६ हजार २७१ घरांची तपासणी करण्यात आली. यापैकी ६० हजार ३४४ दूषित घरे आढळली. तपासणीच्या तुलनेत ३४.२३ टक्के घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्या. यामध्ये तापाचे २,०१६ रुग्ण आढळले. ३,४६२ जणांचे रक्त नमुने, तर ७०२ जणांचे रक्तजल नमुने घेण्यात आले. ३४ हजार १९४ कूलर्स तपासणी केली असता २,८९९ दूषित आढळले.

जनजागृतीवर भर देणार

यासंदर्भात झालेल्या बैठकीत घराघरांमध्ये जाऊन मनपाच्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत जनजागृतीसह उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती हिवताप व हत्तीरोग विभागाच्या अधिकारी दीपाली नासरे यांनी दिली. बैठकीला आरोग्य समिती सभापती महेश महाजन, उपायुक्त राजेश भगत, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, नोडल अधिकारी स्वच्छता डॉ. गजेंद्र महल्ले, अतिरिक्त सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी उपस्थित होते.

 

फवारणी करण्याचे निर्देश

शहरात डेंग्यूची रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रत्येक झोनमध्ये प्रभागनिहाय धूरफवारणी कार्यक्रमाला गती देण्याचे निर्देश आरोग्य समिती सभापती महेश महाजन यांनी सोमवारी बैठकीत दिले.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. नगरसेवकांकडे फवारणीकरिता तक्रार करतात. रुग्णसंख्या कमी व्हावी, यादृष्टीने डास प्रतिबंधक धूरफवारणी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Web Title: Alarm bells! Dengue bite on Nagpur city; Larvae found in every tenth house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.