नागपूर जिल्ह्यात दारू बंदच : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 11:30 PM2020-05-04T23:30:55+5:302020-05-05T00:54:33+5:30

लॉकडाऊनदरम्यान काही भागांना सवलत देण्यात आली असली तरी संपूर्ण नागपुरात दारू बंदच राहणार आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यापूर्वीच नागपूर शहरात दारूबंदी राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता जिल्हधिकारी रवींद्र ठाकरे यांनीसुद्धा संपूर्ण नागपूर जिल्ह्यात दारू बंद राहणार असल्याचा आदेश जारी केला आहे.

Alcohol ban in Nagpur district: Collector's order | नागपूर जिल्ह्यात दारू बंदच : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नागपूर जिल्ह्यात दारू बंदच : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Next
ठळक मुद्दे रेस्टॉरंट व पानठेलेही बंद राहणार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनदरम्यान काही भागांना सवलत देण्यात आली असली तरी संपूर्ण नागपुरात दारू बंदच राहणार आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यापूर्वीच नागपूर शहरात दारूबंदी राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आता जिल्हधिकारी रवींद्र ठाकरे यांनीसुद्धा संपूर्ण नागपूर जिल्ह्यात दारू बंद राहणार असल्याचा आदेश जारी केला आहे.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज सोमवारी जारी केलेल्या आदेशात दारू दुकानासोबतच सर्व बीअर शॉपी, परमिट बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंट, सर्व क्लब, देशी दारूचे दुकान, सर्व रेस्टॉरंट व पानठेलेसुद्धा बंद ठेवण्यात यावे, असे स्पष्टपणे म्हटले आहे.


विमानतळ, रेल्वेस्थानक व बसस्थानकातील उपाहारगृह राहणार सुरू

जिल्हाधिकारी ठाकरे यांनी जारी केलेल्या या आदेशानुसार नागपूर विमानतळ, रेल्वेस्थानक आणि बसस्थानकाच्या आतील इटींग हाऊस मात्र बंदीतून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे ती सुरू राहतील.

राज्य व परराज्यातील परवानगीबाबत बुधवारपासून निर्णय कळवणार

राज्यातील इतर जिल्ह्यात तसेच बाहेरच्या राज्यातील जिल्ह्यात प्रवासाच्या परवानगीसाठी ज्यांनी ऑनलाईन अर्ज केले त्याच्या परवानगीबाबत येत्या ६ मे रोजी कळविण्यात येईल, तसेच ई-पास संदर्भात २ मेनंतरच्या अजार्बाबत ८ मेपासून निर्णय घेण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ही माहिती देत याबाबत पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. परवानगीचा अर्ज ज्या जिल्ह्यासाठी आहे त्या संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेतल्यानंतरच परवानगी देण्यात येईल, असेही स्पष्ट केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, परवानगी मिळण्याबाबतच्या अर्जामध्ये ४,४९० अर्ज शासनाने वाहन व्यवस्था करावी याबाबतचे आहेत. रेल्वेची व्यवस्था झाल्यावर मोबाईलवर अर्जदारास कळविण्यात येणार आहे. स्वत:च्या वाहनाने जाण्याबाबत २,४७२ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी ८३ अर्ज नागपूर शहरातील कंटोन्मेंट झोनमधील असल्यामुळे रद्द करण्यात आले आहे. २२६ अर्जदारांनी नागपूर येथील त्यांचा पत्ता नमूद केला नाही व अपूर्ण आहे. उर्वरित २,१५३ अर्जांमध्ये ते ज्या जिल्ह्यात जाणार आहेत त्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी यांच्यासोबत पत्रव्यवहार करण्यात आला. या २,१५३ अर्जदारांना ६ मे रोजी महानगरपालिका क्षेत्रात जिल्हाधिकारी कार्यालय येथील सेतू अथवा तहसील कार्यालयामधून परवानगीचे वितरण करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील ८६२ अर्जदारांच्या परवानगीचे वितरण संबंधित तहसीलदार कार्यालयातून केल्या जाणार आहे.
परवानगीसाठी महाराष्ट्र पोलीस ई-पास प्रणालीवर ज्या अर्जदारांनी नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या बाहेरील क्षेत्रातून अर्ज केले आहेत, त्याबाबत ऑनलाईन ८ मेपासून कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

Web Title: Alcohol ban in Nagpur district: Collector's order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.