नागपुरात पानठेल्यावर विकली जात आहे दारू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:12 AM2019-01-31T00:12:15+5:302019-01-31T00:14:24+5:30

अबकारी विभागाने एमआयडीसीतील हिंगणा रोडवरील रंगोली बार आणि पानठेल्यावर धाड टाकून दारूची होत असलेली अवैध विक्री उघडकीस आणली. तसेच पानठेला संचालक रुद्रकुमार झा याला अटक केली.

Alcohol is being sold in pan tapari at Nagpur | नागपुरात पानठेल्यावर विकली जात आहे दारू 

नागपुरात पानठेल्यावर विकली जात आहे दारू 

Next
ठळक मुद्देबार मालकाचे कृत्य : अबकारी विभागाची धाड

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अबकारी विभागाने एमआयडीसीतील हिंगणा रोडवरील रंगोली बार आणि पानठेल्यावर धाड टाकून दारूची होत असलेली अवैध विक्री उघडकीस आणली. तसेच पानठेला संचालक रुद्रकुमार झा याला अटक केली.
बुधवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असल्याने दारू विक्री बंद होती. अबकारी विभागाला रंगोली बारच्या संचालकातर्फे जवळच्याच पानठेल्यावर अवैध पद्धतीने दारूची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्या आधारावर अबकारी विभागाने बुधवारी सायंकाळी पानठेल्यावर धाड टाकण्यात आली. पोलिसांना पानठेल्यात १० हजार रुपये किमतीची विदेशी दारू आणि ७ हजार रुपये सापडले. दारूच्या बॉटलची तपासणी केली असता, त्या रंगोली बारमधून आणण्यात आल्याचे उघडकीस आले. या आधारावर अबकारी विभागाने लगेच रंगोली बारवर धाड टाकली. तिथे झडती घेतली असता, पानठेल्यात सापडलेली दारू रंगोली बारमधूनच गेल्याची खात्री झाली. अबकारी विभागाने पानठेला मालकास अटक केली. त्याच्याविरुद्ध अवैध दारू विक्रीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
रंगोली बारकडे दारू विक्रीचा परवाना आहे. त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. या कारवाईमुळे बार संचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
बारजवळच पानठेला किंवा नाश्त्याचे दुकान असते. ते दुकान बहुतांश बार संचालकांचेच असते. बंदीच्या काळात या ठिकाणांहून दारूची अवैध विक्री केली जाते. हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. अबकारी विभाग अलीकडेच सक्रिय झाल्याचे दिसून येते.
ही कारवाई अबकारी विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रावसाहेब कोरे, उमेश शिरभाते, शैलेश अजमिरे, कर्मचारी चंदू गोबाले, विनोद ठाकूर, लखन कनोजिया, विजय कडू, मनोज आस्वले यांनी केली.

Web Title: Alcohol is being sold in pan tapari at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.