दारू वाहतूकदार अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:08 AM2021-06-04T04:08:26+5:302021-06-04T04:08:26+5:30
कुही : दुचाकीवरून देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका आराेपीस कुही पाेलिसांनी ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून देशी दारू ...
कुही : दुचाकीवरून देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका आराेपीस कुही पाेलिसांनी ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून देशी दारू व दुचाकी असा एकूण २२ हजार ८८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई कुही-वडाेदा मार्गावरील सावळी बसथांबा परिसरात बुधवारी (दि.२) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
रितेश रूपचंद राऊत, रा. वाॅर्ड नं. ४ कुही असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. कुही येथून वडाेदामार्गे दारूची चाेरटी वाहतूक केली जात असल्याची गुप्त सूचना कुही पाेलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे कुही पाेलीस पथक पाळत ठेवून हाेते. दरम्यान, सावळी बसथांबा येथे एमएच-४०/एएफ-७२१८ क्रमांकाच्या ॲक्टिव्हा दुचाकीस्वारावर संशय आल्याने पाेलिसांनी त्यास अडवून तपासणी केली असता, दुचाकीवर ४८ बाटल्यांची देशी दारूची पेटी आढळून आली. २,८८० रुपये किमतीची देशी दारू व २० हजाराची दुचाकी असा एकूण २२ हजार ८८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कुही पाेलिसांनी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदविला असून, त्यास अटक केली आहे. ही कारवाई सहायक पाेलीस निरीक्षक कलमेश साेनटक्के, हवालदार अरुण कावळे, गिरीधर राठाेड यांच्या पथकाने केली