सावधान वाघ बुटीबोरीकडे : सोमठाणा गावात मिळाले वाघाचे पगमार्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 11:52 PM2019-11-20T23:52:21+5:302019-11-20T23:54:22+5:30

मिहान परिसरात गेल्या पाच दिवसांपासून फिरत असलेल्या वाघाने बुधवारी बुटीबोरीच्या दिशेने कूच केले. बुधवारी काही लोकांना सोमठाणा गावाकडे वाघ जाताना दिसला. याची माहिती वनविभागाला देण्यात आली.

Alert Tiger To Butibori: A tiger's footmark found in Somthana village | सावधान वाघ बुटीबोरीकडे : सोमठाणा गावात मिळाले वाघाचे पगमार्क

सावधान वाघ बुटीबोरीकडे : सोमठाणा गावात मिळाले वाघाचे पगमार्क

Next
ठळक मुद्देवनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केली गावकऱ्यांसोबत बैठक

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : मिहान परिसरात गेल्या पाच दिवसांपासून फिरत असलेल्या वाघाने बुधवारी बुटीबोरीच्या दिशेने कूच केले. बुधवारी काही लोकांना सोमठाणा गावाकडे वाघ जाताना दिसला. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वन अधिकारी व कर्मचारी गावात पोहचले. त्यांनाही वाघाचे पगमार्क दिसले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघाची हालचाल लक्षात घेतली. त्यांंनी वाघ बुटीबोरी होत बोर अभयारण्याकडे जात असल्याची संभावना व्यक्त केली.
परंतु बुटीबोरी जंगलाकडे जाणाऱ्या मार्गावर गाव असल्याने वन अधिकाऱ्यांनी कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून बुधवारी रात्री गावकऱ्यांसोबत बैठक केली. यावेळी प्रादेशिक वन विभागाचे उपवनसंरक्षक डॉ. प्रभुनाथ शुक्ल, वन्यजीव अध्ययनकर्ता विनीत अरोरा, आरएफओ विजय गंगावने उपस्थित होते. शनिवारी मिहान परिसरात इन्फोसिस कंपनीच्या मागे एका कर्मचाऱ्याला वाघ दिसला होता. यानंतर वनविभागाने परिसरात तात्काळ कॅमेरा ट्रॅप लावले. रविवारी रात्री १०.३० वाजता एका कॅमेऱ्यात वाघ कैदही झाला. त्यानंतर वन विभागाने मिहान परिसरात ३० कॅमेरा ट्रॅप लावले. दिवसरात्र परिसरात गस्त दिली. सोमवार व मंगळवार वाघ काही दिसला नाही. परंतु बुधवारी दोन लोकांना सोमठाणा गावाकडे वाघ जात असल्याचे दिसले. बुधवारी गावकऱ्यांना वाघ दिसल्यावर काय सावधगिरी बाळगली पाहिजे, यासंदर्भात सूचना केल्या.
 यापूर्वी फेटरीतही दिसला होता वाघ
काटोल रोडवरील फेटरी येथे काही दिवसांपूर्वी वाघ दिसला होता, तेव्हाही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे वनविभागाने फेटरी व आसपासच्या गावातील प्रमुख व्यक्तींसोबत सरपंच यांची बैठक घेतली होती. त्यांना नागपुरात बोलावून लाईव्ह प्रशिक्षण दिले होते. वाघ दिसल्यास कुठली सावधगिरी बाळगावी, हे समजून घेत गावकऱ्यांनी वन विभागाशी समन्वय साधला होता. त्यामुळे फेटरी येथे कुठलीही अनुचित घटना घडली नाही आणि वाघही आपल्या अधिवासात निघून गेला. फेटरीचाच फॉर्म्युला वनविभाग मिहान, बुटीबोरी परिसरातील गावात वापरत आहे.
 अफवा पसरविणाऱ्याला नोटीस
मिहान परिसरात वाघ असल्याची पुष्टी झाल्यानंतर सोशल मीडियावर लोकांकडून अफवा पसरविली जात आहे. वाघाचे फोटो पोस्ट करून लोकांमध्ये दहशत पसरविली जात आहे. अशा लोकांवर वनविभागाची टीम नजर ठेवून आहे. काही लोकांची नावे वनविभागाला कळली आहे. त्यांना लवकरच नोटीस देऊन त्यांच्याकडून पुष्टीचे प्रमाण मागणार आहे.

Web Title: Alert Tiger To Butibori: A tiger's footmark found in Somthana village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.