मुंबईतील सर्व इमारतींच्या ‘फायर’ सुरक्षेची तपासणी होणार, विधानपरिषदेत सरकारची माहिती

By योगेश पांडे | Published: December 8, 2023 04:28 PM2023-12-08T16:28:22+5:302023-12-08T16:28:41+5:30

विधानपरिषदेत प्रसाद लाड यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला होता.

All buildings in Mumbai will be inspected for fire safety, informed the government in the Legislative Council | मुंबईतील सर्व इमारतींच्या ‘फायर’ सुरक्षेची तपासणी होणार, विधानपरिषदेत सरकारची माहिती

मुंबईतील सर्व इमारतींच्या ‘फायर’ सुरक्षेची तपासणी होणार, विधानपरिषदेत सरकारची माहिती

नागपूर :मुंबईत टोलेजंग इमारतींसोबतच तेथे आगीचा धोकादेखील वाढतो आहे. इमारतींमधील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असल्याची माहिती इमारतीचे मालक किंवा सोसायटीकडून वर्षातून दोनदा सादर होणे अनिवार्य आहे. मात्र अनेक इमारतींमध्ये अग्निशमन सुरक्षाविषयक नियमांसंदर्भात सुविधाच नसल्याचे चित्र आहे. ही बाब लक्षात घेता मुंबईसह ‘एमएमआर’मधील सर्वच उंच इमारतींच्या ‘फायर’ सुरक्षेची तपासणी करण्यात येईल, अशी माहिती राज्य शासनातर्फे मंत्री उदय सामंत यांनी दिली. विधानपरिषदेत प्रसाद लाड यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित केला होता.

महाराष्ट्र अग्नी प्रतिबंधक व जीवसंरक्षण उपाययोजना अधिनियमाअंतर्गत इमारतींचे मालक-भोगवटादार, गृहनिर्माण संस्थांना फायर ऑडिट करणे अनिवार्य आहे. तसा अहवालदेखील त्यांना बीएमसीला सादर कराव लागतो. मुंबई अग्निशमन दलातर्फेदेखील इमारतींची तपासणी करण्यात येते. ऑक्टोबर २०२३ मध्ये गोरेगाव येथील जय भवानी इमारतीला लागलेल्या आगीनंतर हा मुद्दा ऐरणीवर आला होता. यानंतर बीएमसीतर्फे मुंबईतील ३४३ एसआरए इमारतींची तपासणी करण्यात आली होती. २०१५ सालापासून ते आतापर्यंत तपासणी झालेल्या इमारतींची संख्या ५ हजार ८९० इतकीच आहे. अनेक इमारतींकडून अग्निशमन यंत्रणेबाबतच्या नियमांचे पालनच करण्यात येत नाही. मुंबईत २.१५ लाख इमारती आहेत. यातील सर्व उंच इमारतीचे फायर ऑडिट होत आहे की नाही याचे सर्वेक्षण करण्यात येईल. तसेच एमएमआरमध्ये यासंदर्भात भरारी पथकदेखील गठीत करण्यात येईल, अशी माहिती सामंत यांनी दिली.

Web Title: All buildings in Mumbai will be inspected for fire safety, informed the government in the Legislative Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.